Home | Jeevan Mantra | Dharm | The Worship Is Important For All Involved To Know These 10 Things.

धर्म ज्ञान - सर्वांसाठी आवश्यक आहेत देवपूजा संदर्भातील या 10 गोष्टी

धर्म डेस्क | Update - Nov 20, 2013, 01:07 PM IST

देव-देवतांचे पूजन हिंदू धर्मातील अविभाज्य घटक आहे. पूजा-अर्चना, नामस्मरण नसेल तर हिंदू धर्माची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.

 • The Worship Is Important For All Involved To Know These 10 Things.

  देव-देवतांचे पूजन हिंदू धर्मातील अविभाज्य घटक आहे. पूजा-अर्चना, नामस्मरण नसेल तर हिंदू धर्माची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. हिंदू धर्माला मानणारा प्रत्येक व्यक्ती दररोज कोणत्या न कोणत्या स्वरुपात भगवंताचे स्मरण अवश्य करतो. हिंदू धर्मग्रंथामध्ये देवांच्या पूजेसंदर्भात विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, परंतु माहितीच्या अभावामुळे बरेच लोक पूजा करताना काही गोष्टींचे पालन करत नाहीत.

  आज आम्ही तुम्हाला देवी-देवतांचे पूजन करण्यासंबंधी काही खास गोष्टी सांगत आहोत...

 • The Worship Is Important For All Involved To Know These 10 Things.

  1- सूर्य, श्रीगणेश, दुर्गा, शिव आणि विष्णु कोयांना पंचदेव मानले गेले आहे. सुखाची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दररोज या पाच देवांची पूजा अवश्य करावी. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी या देवांची पूजा करणे अनिवार्य आहे.

 • The Worship Is Important For All Involved To Know These 10 Things.

  2 - महादेवाच्या पूजेमध्ये केतकीच्या फुलांचा उपयोग करू नये. सूर्यदेवाच्या पूजेमध्ये अगस्त्य फुल वर्जित आहे. श्रीगणेशाला तुळशीचे पान अर्पण करू नये.

 • The Worship Is Important For All Involved To Know These 10 Things.

  3 - सकाळी स्नान केल्यानंतर जो मनुष्य देवांसाठी फुल तोडून आणतो आणि त्यांना अर्पण करतो, त्या फुलांचा देवगण प्रसन्नतेने स्वीकार करतात. वायुपुराणानुसार जो व्यक्ती स्नान करण्यापूर्वी तुळशीचे पान तोडतो आणि देवांना अर्पण करतो, अशी पूजा देवता ग्रहण करत नाहीत.

 • The Worship Is Important For All Involved To Know These 10 Things.

  4 - पूजेमध्ये देवांना अनामिकेने (मधले बोट) गंध लावण्याचे विधान शास्त्रामध्ये वर्णीत आहे. पूजा करताना तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला आणि तेलाचा दिवा उजव्या बाजूला ठेवावा.

 • The Worship Is Important For All Involved To Know These 10 Things.

  5 - तंत्र शास्त्रानुसार पूजेमध्ये देवांना धूप-दीप अवश्य दाखवावा तसेच नैवेद्यही आवश्यक आहे. देवासमोर लावलेला दिवा स्वतःच्या हाताने विझवू नये.

 • The Worship Is Important For All Involved To Know These 10 Things.

  6 - पूजेमध्ये शिळे,सुकलेले फुलं, पानं यांचा उपयोग करू नये. शास्त्रानुसार गंगाजल, तुळशीपत्र, बिल्वपत्र आणि कमळ हे कोणत्याही स्थितीमध्ये शिळे नसतात.

 • The Worship Is Important For All Involved To Know These 10 Things.

  7 - लिंगार्चन चंद्रिकानुसार सूर्यदेवाला सात, गणपतीला तीन, विष्णुदेवाला चार आणि महादेवाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात. काही ग्रंथांमध्ये महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालावी असे सांगण्यात आले आहे.

 • The Worship Is Important For All Involved To Know These 10 Things.

  8 - विष्णुदेवाला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे तसेच शक्ती(देवी), सूर्य, आणि श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पांढर्या रंगाचे वस्त्र अर्पण करण्याचे विधान आहे.

 • The Worship Is Important For All Involved To Know These 10 Things.

  9 - महादेवाला हळद लावू नये तसेच शंखाने जल अर्पण करू नये. शास्त्रानुसार हे दोन्ही कर्म शिव पूजेमध्ये वर्ज्य आहेत. देवघराची दररोज स्वच्छता करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची घाण, कचरा जमा होऊ देवू नये.

 • The Worship Is Important For All Involved To Know These 10 Things.

  10 - देवघराच्या वर कोणत्याही जड, उपयोगात नसलेल्या वस्तू ठेवू नयेत. देवघरात पावित्र्य राखावे. चप्पल, बूट, चमड्याच्या वस्तू देवघरात नेवू नयेत.

Trending