प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात सुख आणि दुःख ये-जा करती असतात. यामुळेच म्हटले जाते की, कोणताही व्यक्ती पूर्णपणे सुखी राहत नाही. कोणती न कोणती कमतरता प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात अवश्य असते, परंतु महाभारतातील एक प्रसंगामध्ये महात्मा विदुर यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत. जर या गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे असतील तर तो कधीही दुःखी राहत नाही म्हणजेच नशीबवान असतो. महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये महात्मा विदुर यांनी या युगात सहा प्रकारचे सुख सांगितले आहेत. जे पुढील प्रमाणे आहेत...
श्लोक
अर्थागमों नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च।
वश्यश्च पुत्रो अर्थकरी च विद्या षट् जीव लोकेषु सुखानि राजन्।
अर्थ - 1. धन, 2. निरोगी शरीर, 3. सुंदर पत्नी, 4. जी प्रिय बोलणारी असेल, 5. मुलगा आज्ञाधारक असणे, आणि 6. धन मिळवून देणाऱ्या विद्येचे ज्ञान असणे. या सहा गोष्टी मनुष्याला सुख देतात.
1. धन
सुखी जीवनासाठी पैसा असणे खूप आवश्यक आहे. पैसा नसेल तर मान मिळत नाही आणि यशही. कुटुंबाचे पालन-पोषण करण्यासाठी धन आवश्यक आहे. सध्याच्या काळात शिक्षण घेण्यासाठीसुद्धा भरपूर पैसा लागतो. पैसे नसेल तर एखाद्या आजारी व्यक्तीवर उपचार करणेसुद्धा शक्य नाही. वृद्धावस्थेमध्ये पैसाच सर्वात मोठा आधार असतो. जीवनात धनाची आवश्यकता सर्वात जास्त म्हातारपणातच असते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर पाच गोष्टी जवळ असल्यास मनुष्य का दुःखी होत नाही...