आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shingnapur Is Also Famous For The Fact That No House In The Village Has Doors

या आहेत शनि शिंगणापूर मंदिराशी संबंधित 7 मान्यता आणि परंपरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनि शिंगणापूरमध्ये शनि चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. महिलांना शनि चौथऱ्यावर प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या महिला आंदोलकांनी कंबर कसली आहे, तर मंदिर संचालक बोर्डाच्या सदस्यांनी महिलांना चौथऱ्यावर जाऊ न देण्याची परंपरा प्राचीन असून ही बदलली जाऊ शकत नाही असे सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला शनि शिंगणापूर मंदिराशी संबंधित काही मान्यता आणि प्रथा सांगत आहोत.

यामुळे तेल अर्पण करू शकत नाहीत महिला
धर्म ग्रंथानुसार, शनिदेव श्रीकृष्णाचे परम भक्त आहेत. सूर्यपुत्र शनीचे लग्न चित्ररथ नावाच्या गंधर्वाच्या कन्येशी झाले होते. जी स्वभावाने खूप रागीट होती. एकदा शनिदेव श्रीकृष्णाची उपासना करण्यात मग्न होते, तेंव्हा शनिदेवाची पत्नी पुत्र प्राप्तीच्या इच्छेने शनिदेवाकडे गेली. परंतु शनिदेव श्रीकृष्णाच्या भक्तीत एवढे मग्न झाले होते की, त्यांना पत्नी आल्याचे कळलेच नाही. त्यांनी तिच्याकडे पाहिलेदेखील नाही. त्यामुळे क्रोधीत होऊन पत्नीने शनिदेवाला शाप दिला की "मी तुमची पत्नी असूनसुद्धा तुम्ही माझ्याकडे प्रेमाने पाहिले नाही" त्यामुळे आता तुम्ही ज्या गोष्टीवर दृष्टी टाकाल ती नष्ट होईल. त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी अशुभ घटना घडेल. तेव्हापासून शनिदेवाची दृष्टी अशुभ मानली जाऊ लागली. पत्नी (स्त्री)ने दिलेल्या शापामुळेच शनीदेवावर महिला तेल अर्पण करू शकत नाहीत, असे या प्रथेमागचे कारण असू शकते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या...
कोणत्या गोष्टीमुळे हे मंदिर आहे खास ?
कोणत्या कारणामुळे शनिदेवाला अर्पण केले जाते तेल ?
कोणत्या कारणामुळे शनिदेवाचा रंग आहे काळा ?
स्नान करूनच घेतले जाते शनिदेवाचे दर्शन...
या गावातील घरांना कुलूप लावले जात नाही...