आज (22 ऑक्टोबर, गुरुवार) विजयादशमी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, आजच्या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता. रावण दहनाचा अर्थ असा आहे की,
आपण आपल्या मनातील वाईट विचारांचा अंत करून श्रीरामाच्या आदर्शाचे पालन करण्याचा प्रयत्न करावा.
सध्या फेसबुक, व्हॉट्सअपसहित संपूर्ण सोशल मिडीयावर रावणाच्या संदर्भात विविध मेसेज व्हायरल होत आहे की - रावणाचे बहिण शूर्पणखावर खूप प्रेम होते, तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने सीतेचे हरण केले, एवढा संयमी होता की सीतेच्या इच्छेशिवाय तिला कधीहि बळजबरीने स्पर्श केला नाही आणि रावण आपल्या जीवनकाळात कोणाकडूनही पराभूत झाला नाही. या युगात लोक रावण झाले तरी खूप आहे इत्यादी... परंतु या सर्व गोष्टींमागचे सत्य काही वेगळेच आहे. आज आम्ही तुम्हाला तेच सत्य सांगत आहोत...
असत्य 1 - रावण खूप संयमी होता, त्याने कधीच बळजबरीने देवी सीतेला हात लावला नाही.
सत्य - रावणाने सीतेला बळजबरीने कधीच हात लावला नाही कारण त्याला कुबेराचा मुलगा नलकुबेर याने शाप दिला होता की, रावणाने कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुध्द स्पर्श केला किंवा तिला महालात ठेवले तर त्याच्या डोक्याचे शंभर तुकडे होतील. याच कारणामुळे रावणाने सीतेला कधीही हात लावण्याचा प्रयत्न केला नाही आणि आपल्या महालातही ठेवले नाही.
रावणाशी संबंधित इतर भ्रम आणि त्यांचे सत्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...