आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Things To Know Hinduism Swastik Symbol Of Prosperity

हळदीचा हा छोटा उपाय केल्यानेही दूर होते गरिबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वस्तिक चिन्हाला भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात स्वस्तिक काढून केली जाते. स्वस्तिक सुख-सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. ऋग्वेदामध्ये स्वस्तिकचे देवता सवृन्त यांचा उल्लेख आहे. सवृन्त सूत्रानुसार या देवतेला मनोवांचछित फळदाता, संपूर्ण जगाचे कल्याण करणारे आणि देवांना अमरत्व प्रदान करणारे मानण्यात आले आहे. स्वस्तिक शब्द 'सु' आणि 'अस्ती' या अक्षरांपासून तयार झाला आहे. 'सु' चा अर्थ शुभ आणि 'अस्ती' चा अर्थ होणे म्हणजे ज्यामुळे 'शुभ होवो' कल्याण होवो' तेच स्वस्तिक आहे.

याच कारणामुळे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी स्वस्तिकचा उपयोग केला जातो. स्वस्तिक चिन्हाला भाग्यवर्धक वस्तूंमध्ये गणले जाते. स्वस्तिक काढल्याने घरातील नकारात्मक उर्जा घराबाहेर जाते. घरातील कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर थोडेसे गोमुत्र शिंपडून दरवाजा स्वच्छ करून घ्यावा. त्यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूला हळद-कुंकुवाने स्वस्तिक काढावे. हा उपाय नियमित केल्यास वास्तुदोष नष्ट होतील तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात निवास करेल.

पुढे वाचा - धर्म शास्त्रामध्ये स्वस्तिक संदर्भात काय सांगितले आहे..