आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज एकादशी : हे 11 चमत्कारी उपाय पूर्ण करतील तुमच्या सर्व इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. ही तिथी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. यामुळे या दिवशी यांना प्रसन्न करण्यासाठी भक्तगण व्रत आणि विशेष पूजा करतात. धर्म ग्रंथानुसार या दिवशी काही विशेष उपाय केल्यास भगवान विष्णू आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

या महिन्यात २४ तारखेला शनिवारी 'अपरा' एकादशी आहे. या एकादशीला अचला एकादशी असेही म्हणतात. शास्त्रामध्ये या एकादशीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. अपरा एकादशीचा उपवास करून भगवान वामनाची पूजा केल्याने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होऊन वैकुंठात प्रतिष्टीत होतो. आजच्या दिवशी काही खास उपाय केल्यास सर्व सुखांची प्राप्ती होते. येथे जाणून घ्या, भगवान विष्णूला प्रसन्न करण्याचे सोपे उपाय...

1 - अपरा एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होतात. त्यानंतर विधीपूर्वक गायत्री मंत्राचा जप करावा.