आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is The Stepbrother Of Ravana The Pandavas Stayed In His Palace

हे आहेत रावणाचे सावत्र भाऊ, पांडव थांबले होते यांच्या महालात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वांनाच हे माहिती आहे की, रावणाला कुंभकर्ण आणि विभीषण हे दोन भाऊ होते. परंतु रावणाच्या सावत्र भावाविषयी फार कमी लोकांना माहिती असावे. ग्रंथांमध्ये यांचे नाव कुबेर सांगण्यात आले आहे. कुबेर राजांचे अधिपती आणि धनाचे स्वामी आहेत. हे देवतांच्या धनाध्यक्ष रुपात ओळखले जातात. महाभारतानुसार वनवास काळात पांडवानी एक रात्र यांच्या महालात व्यतीत केली होती.

पुराणानुसार गंधमादन पर्वतावर स्थित संपत्तीचा चौथा भाग यांच्या नियंत्रणात असून यामधील सोळावा भाग मानवांना देण्यात आला आहे. कुबेर नऊ निधींचे अधिपती आहेत. (पद्म, महापद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील, आणि वर्चस) असे म्हणतात की, यामधील एक निधीच अनंत वैभव प्रदान करणारी आहे. हे उत्तराधीपती म्हणजे उत्तर दिशेचे स्वामी आहेत.

पुढे वाचा, कुबेरदे कसे झाले रावणाचे सावत्र भाऊ...