आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Mother Temples In Pakistan, Muslims Bow Head Devotedly.

पाकिस्‍तानमधील या मंदिरात भक्तिभावाने नतमस्‍तक होतात मुस्‍लीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईश्‍वराची भक्‍ती करण्‍यासाठी ठराविक जातीत जन्‍माला येणे गरजेचे नसते. पाकिस्‍तानमध्‍ये हिंगलाज मातेचे एक मंदिर आहे.ज्‍या मंदिरामध्‍ये असंख्‍य मुस्‍लीम भक्तिभावाने हिंगलाज मातेसमारे नतमस्‍तक होतात. 28 मार्चला ( शुक्रवार) हिंगलाज मातेची जयंती आहे. भारत देशामध्‍ये हिंगलाज मातेचे अनेक मंदिरे असली तरी सर्वात जुणे मंदिर पाकिस्‍तानमध्‍ये आहे. 52 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्‍हणून या मंदिराला ओळखले जाते. लोक-कथेनुसार चारणों समाजाची कुलदेवता म्‍हणून हिंगलाज माता ओळखली जाते. पाकिस्‍तानातील हिंदू आणि मुस्‍लीम या दोन्‍हीं धर्माचे लोक या मंदिरात मातेचे दर्शन घेण्‍यासाठी येतात. मुस्‍लीम या मंदिराला ' नानी पीर' या नावाने ओळखतात तर, हिंदू हिंगलाज माताच्‍या दर्शनासाठी या मंदिरात येतात. सर्व शक्‍तीचे स्‍थान म्‍हणून या मंदिराला ओळखले जाते. या मातेच्‍या दर्शनासाठी कराचीपासून असंख्‍य मुस्‍लीम येतात.
सातों द्वीप शक्ति सब रात को रचात रास।
प्रात:आप तिहु मात हिंगलाज गिर में।।
या मंत्रानुसार सर्व शक्‍ती सात दिव्‍याच्‍या माध्‍यमातून सकाळपर्यंत हिंगलाजमातेमध्‍ये संचार करतात.
कुठे आहे हिंगलाजमातेचे मंदिर-
पाकिस्‍तानातील बलूचिस्‍तानची राजधानी कराचीपासून 120 कि.मी. आंतरावर हिंगलाजमातेचे मंदिर आहे. पाकिस्‍तानच्‍या उत्तर-पश्चिमेला असलेल्‍या हिंगोल नदीच्‍या काठावर हे मंदिर आहे. या मंदिरामध्‍ये जाण्‍याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग डोंगर- द-यातून जातो तर दुसरा मार्ग मरूस्‍थली जवळून जातो.
या मंदिराची अख्‍यायीका वाचा पुढील स्‍लाईडवर...