आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : वर्षातून केवळ एकदाच उघडते हे नाग मंदिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या महादेवाला प्रिय असलेला श्रावण मास सुरु आहे. या महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण आहे. नागपंचमीला नागांची पूजा करण्याचे विधान आहे. या दिवशी देशभरातील विविध नाग मंदिरांमध्ये भक्तांची अलोट गर्दी जमा होते. मध्यप्रदेशची धार्मिक राजधानी उज्जैनमधल भगवान नागचंद्रेश्वरचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची खास विशेषता म्हणजे हे वर्षातून एकदाच (नागपंचमी) उघडते.

मनोहक मूर्ती
ज्योतिर्लिंग महाकालेश्वरच्या सर्वात वरच्या भागावर असलेल्या नागचंद्रेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येथे नागपंचमीच्या दिवशी येतात. नागचंद्रेश्वरच्या दर्शनासाठी नागपंचमीच्या एकदिवस अगोदरच भक्तांच्या लांब-लांब रांगा लागतात. मंदिरात प्रवेश करताच उजव्या बाजूला नागचंद्रेश्वरची मनमोहक मूर्ती आहे. शेषनागाच्या आसनावर विराजित शिव-पार्वतीच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊन भक्त स्वतःला धन्य मानतात. ही मूर्ती मराठाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. ही मूर्ती शिव-शक्तीचे प्रतिक आहे.

कसे पोहोचाल -
भोपाळ-अहमदाबाद रेल्वे मार्गावर स्थित उज्जैन एक पवित्र धार्मिक नगर आहे. इंदूरपासून उज्जैन केवळ 55 किलोमीटर दूर आहे. देशातील प्रमुख शहरांमधून उज्जैनसाठी बस सहजपणे मिळतात. जवळचे विमानतळही इंदूरला आहे.

भगवान नागचंद्रेश्वरचे आणखी काही आकर्षक फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...