आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : येथे नदीची धारा करते हजारो शिवलिंगांचा अभिषेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटक राज्यातील शहर सिरसीमध्ये शल्मला नावाची नदी वाहते. या नदीचे एक खास वैशिष्ठ्य म्हणजे या नदीमध्ये हजारो शिवलिंग आहेत. हे सर्व शिवलिंग नदीमधील खडकांवर आहेत. येथील खडकांवर शिवलिंगासोबतच नंदी, साप इ. महादेवाला प्रिय असलेल्या गोष्टींच्या आकृती आहेत. हजारो शिवलिंग एकच ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणाला सहस्त्रलिंग नाव पडले आहे.

राजा सदाशिवराय यांनी केले होते यांचे निर्माण
प्राचीन मान्यतेनुसार, 16 व्या शतकात सदाशिवराय नावाचा एक राजा होता. राजा सदाशिवराय महादेवाचे भक्त होते. शिव भक्तीमध्ये नेहमी लीन असल्यामुळे हे भगवान महादेवाच्या अद्भुत रचनेचे निर्माण करण्यास इच्छुक होते. यामुळे राजा सदाशिवराय यांनी शल्मला नदीच्या मधोमध भगवान शिव आणि त्यांच्या प्रियजनांच्या हजारो मूर्ती कोरून घेतल्या. नदीच्या मधोमध हे सर्व शिवलिंग असल्यामुळे दुसरे कोणी नाही तर स्वतः शल्मला नदी यांचा अभिषेक करते.

शिवरात्री आणि श्रावणामध्ये भक्तांची अलोट गर्दी होते
हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी येथे दररोज भक्तांची गर्दी होते परंतु शिवरात्री आणि श्रावणात येथे भक्तांची अलोट गर्दी पहावयास मिळते. येथे येउन भक्त हजारो शिवलिंगाचे दर्शन आणि अभिषेकचा लाभ घेतात.

या ठिकाणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...