आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिलकुंद चतुर्थी आज : या सोप्या विधीने करा श्रीगणेशाची पूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार माघ मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी व्रत केले जाते. या तिथीला विनायक चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असेही म्हणतात. या वर्षी हे व्रत 23 जानेवारी शुक्रवारी आहे. या दिवशी श्रीगणेशाची व चंद्राची विशेष पूजा केली जाते. या व्रताचा विधी अशाप्रकारे आहे...

सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आसनावर बसून श्रीगणेशाची पूजा करा. पूजा करताना श्रीगणेशाला धूप-दीप दाखवा. त्यानंतर फळ, फुल, अक्षता, वस्त्र, गंध, दुर्वा अर्पण करून पूजा करा. पूजा झाल्यानंतर तिळापासून तयार केलेल्या पदार्थांचा किंवा लाडू, मोदकांचा नैवेद्य दाखवा.

या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने लाल वस्त्र धारण करावेत. पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. पूजा झाल्यानंतर ऊं श्रीगणेशाय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा.

संध्याकाळी कथा ऐकल्यानंतर गणपतीची आरती करावी. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पंचोपचार पूजा करवी. अशाप्रकारे भगवान श्रीगणेशाची पूजा केल्यास मानसिक शांती प्राप्त होईल तसेच घरामध्ये सुख-समृद्धी राहील.