आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tips About Happy Married Life According To Hindu Mythology

ग्रंथानुसार पत्नीमध्ये असावेत हे खास गुण, आयुष्य राहते सुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात जर एखाद्या पुरुषाला सर्वगुण संपन्न पत्नी मिळाली तर त्याने स्वतःला भाग्यशाली समजावे. असे आपल्या धर्म शास्त्रामध्ये लिहिण्यात आहे. गरुड पुराणामध्ये पत्नीच्या गुणांसंदर्भात सविस्तरपणे सांगण्यात आले आहे.

गरुड पुराणानुसार, ज्या व्यक्तीच्या पत्नीमध्ये उक्त सर्व गुण असतील, त्याने स्वतःला देवराज इंद्रसमान समजावे कारण सर्वगुण संपन्न पत्नी मिळाल्यास जीवनातील अर्ध्या समस्या स्वतःहून समाप्त होतात. आज आम्ही तुम्हाला गरुड पुराणात स्त्रियांशी संबंधित सांगण्यात आलेल्या काही गुणांची माहिती देत आहोत.

सा भार्या या गृहे दक्षा सा भार्या या प्रियंवदा।
सा भार्या या पतिप्राणा सा भार्या या पतिव्रता।। (108/18)

अर्थ - जी पत्नी गृहकार्यात दक्ष, जी प्रियवादिनी, पतीच तिच्यासाठी प्राण आहे आणि जी पतिपरायणा आहे वास्तवामध्ये तीच पत्नी आहे.

धर्माचे आचरण -
गरुड पुराणानुसार जी पत्नी स्नान करून पतीसाठी श्रुंगार करते, कमी खाते, कमी बोलते तसेच सर्वगुण संपन्न आहे. जी निरंतर धर्माचे आचरण करते तसेच पतीला प्रसन्न ठेवते तीच खर्‍या अर्थाने पत्नी आहे. ज्या व्यक्तीच्या पत्नीमध्ये हे सर्व गुण असतील त्याने स्वतःला भाग्यवान समजावे.

पत्नीमधील या गुणांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा....