Home | Jeevan Mantra | Dharm | Tips For Tuesday For Us Importance Of Mangal Dev

PICS : मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्याचे सोपे अचूक उपाय

धर्म डेस्क | Update - Nov 27, 2013, 06:45 AM IST

तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा दोष असेल तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

 • Tips For Tuesday For Us Importance Of Mangal Dev

  तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाचा दोष असेल तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वेळेवर लग्न जमत नाही, आर्थिक स्थिती व्यवस्थित नसते, घर, जमीन या गोष्टींचा ताण डोक्यावर राहतो, मंगळ हा भूमी पुत्र आहे, त्यामुळे जमिनीशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. तुम्ही जमिनीचे, प्रॉपर्टीचे व्यवहार करीत असाल तर, भरपूर फायद्यासाठी तुम्हाला मंगळ ग्रहाला खुश ठेवणे आवश्यक आहे.

  मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यसाठी पुढे दिलेले उपाय अवश्य करून पाहा...

 • Tips For Tuesday For Us Importance Of Mangal Dev

  - मंगळाच्या क्रोधामुळे मंगळ असणार्‍यांना अशुभ फळ भोगावे लागतात. पत्रिकेत जर प्रथम, चतुर्थ,सप्तम किंवा दुसर्‍या स्थानात मंगळ असेल तर त्या व्यक्तीस मंगळी मानले जाते. अशा लोकांनी मंगळवारी पुढे दिलेले उपाय करावेत.

 • Tips For Tuesday For Us Importance Of Mangal Dev

  - लाल रंग मंगळ ग्रहाचा विशेष प्रिय रंग आहे. त्यामुळे मंगळवारी जेवणात लाल रंग असलेल्या अन्नाचा समावेश करावा, उदा. इमरती, मसुराची डाळ इत्यादी.

 • Tips For Tuesday For Us Importance Of Mangal Dev

  - मसुराची डाळ नदीमध्ये प्रवाहित करा आणि या डाळीचे दान केल्यासही मंगळ देव लवकर प्रसन्न होतात.

 • Tips For Tuesday For Us Importance Of Mangal Dev

  - मंगळ ग्रहाचा मंत्र - ऊँ अंगारकाय विद्महे शक्तिहस्ताये धीमहि तन्नौ भौम: प्रचोदयात्। या मंत्राचा जप करावा.

 • Tips For Tuesday For Us Importance Of Mangal Dev

  - तांबे किंवा सोन्याच्या अंगाठीमध्ये रत्न घालून ती अंगठी बोटात घाला परंतु रत्न धारण करण्यापूर्वी योग्य ज्योतिष पंडिताला स्वतःची कुंडली अवश्य दाखवा.

 • Tips For Tuesday For Us Importance Of Mangal Dev

  - मंगळ ग्रह परम मातृभक्त आहे. आई-वडिलांची सेवा करणाऱ्या लोकांवर त्याचे विशेष लक्ष असते. त्यामुळे मंगळवारी आपल्या आईला लाल रंगाची वस्तू भेट स्वरुपात द्यावी. मंगळ ग्रहाशी संबंधित कोणत्याही वस्तूचा भेट म्हणून स्वीकार करू नये.

 • Tips For Tuesday For Us Importance Of Mangal Dev

  - मंगळवार हनुमानाचा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे.
  - सुंदरकांड किंवा हनुमान चाळीसाचे पठन करावे.

 • Tips For Tuesday For Us Importance Of Mangal Dev

  - ज्योतिष्य शास्त्रानुसार मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी लाल रंगाचा बैल, सोने, तांबे, मसुराची डाळ, बत्ताशा, लाल वस्त्र इत्यादी गोष्टी एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला दान कराव्यात.

Trending