आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, देशभरात कोठे आहेत कोणकोणते प्राचीन तीर्थस्थळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीर्थस्थळाचे नाव समोर येताच आपल्यासमोर नदी, साधू-संत, पूजा, उपासना आणि मठ-मंदिरांचे चित्र उभे राहते. तीर्थ केवळ एक धार्मिक कर्म नसून याची एक व्यावहारिक व्याख्यासुद्धा आहे. तीर्थस्थळाला असलेल्या महत्त्वामुळे आपल्या मनात नमनाचा भाव निर्माण होतो. यात्रा पूर्ण करण्यासाठी जे परिश्रम आणि नियम पाळावे लागतात त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधार होतो. आत्मविश्वास वाढतो.

भारत तीर्थस्थळांच्या बाबतीत अद्भुत स्वरुपात श्रीमंत आहे. तीर्थस्थळावरून व्यक्ती घरी आल्यानंतर स्वतःमध्ये अतिरिक्त उर्जा, उत्साहाचा अनुभव करतो. हा फ्रेशनेस त्याला काम करण्यासाठी अधिक योग्य बनवतो. भारतीय तीर्थांची विशेषता म्हणजे तेथील दैवी महत्त्व, निसर्गाचा आनंद आणि पोहोचण्याचा मार्ग. या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन येथे तीर्थस्थळांचे वर्णन करण्यात येत आहे. पहिले हे जाणून घ्या, तीर्थस्थळ किती आणि कोठे आहेत.

सामान्यतः चारधाम, बारा ज्योतिर्लिंग, सप्तसुरी आणि 51 शक्तीपीठ तीर्थस्थळ मानले जातात. चारधामची स्थापना आद्यशंकराचार्य यांनी केली होती. उद्येश्य होता, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम चार दिशांमध्ये स्थित या धामांची यात्रा करून मनुष्याने भारताचे सांस्कृतिक महत्त्व जाणून घ्यावे. या व्यतिरिक्त तिरुपती बालाजी, वैष्णवदेवी, शिर्डीचे साईबाबा, सालासर हनुमान, मेहंदीपूर बालाजी, बाबा अमरनाथसहित इतर प्रमुख मंदिरांना तीर्थ स्वरुपात पूजले जाते. अथर्ववेदानुसार तीर्थ यात्रा केल्याने पुण्यलोकाची प्राप्ती होते.

पुढे जाणून घ्या, चारधाम, बारा ज्योतिर्लिंग, सप्तपुरी आणि 51 शक्तीपीठांची नावे आणि सर्व तीर्थस्थळ नदी किनारीच का आहेत....