आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतामधील Top 10 मंदिरे : येथे सर्वात जास्त अर्पण केले जाते धन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील मंदिरे प्राचीनता आणि मान्यतेमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. काही मंदिरे असे आहेत, जेथे फक्त कमाईच होत नाही तर येथे येणार्‍या भक्तांची संख्या प्रत्येक वर्षी चकित करणार्‍या आकड्यांमध्ये समोर येते. अनेक मंदिरांमध्ये लाखो-कोटीचे दान जमा होते. असे मानले जाते की, ही सर्व मंदिरे चैतन्य असून येथून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. आज आम्ही तुम्हाला अशा मंदिरांची माहिती देत आहोत, जेथे वर्षभर भक्तांची गर्दी राहते. येथे जाणून घ्या, भारतातील दहा सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या मंदिरांची माहिती...
श्री पद्मनाभस्वामी मंदिर
त्रिवेंद्रम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिर आपली भव्यता, स्थापत्य कला आणि ग्रॅनाईटमधील स्तंभांची दीर्घ श्रृंखला यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराची निर्मिती 18 व्या शतकात त्रावणकोर राज्याचा राजा मार्तंड वर्मा यांनी केली होती. आता या मंदिराचे कामकाज राजघराण्याकडे आहे. या मंदिरातील मूर्तीमध्ये भगवान विष्णू शेषनागावर शयन मुद्रेत विराजमान आहेत. तिरुअनंतपुरम हे नाव भगवान विष्णूंच्या अनंत नावाच्या नागाच्या नावावर ठेवण्यात आले असल्याचे मानले जाते. येथे भगवान विष्णूंच्या विश्राम अवस्थेला पद्मनाभ म्हटले जाते. पद्मनाभस्वामी मंदिरातील तळघरातील पाच खोल्यांमधून एक लाख कोटी रूपयांचे मौल्यवान दागिने, सोने, चांदीचे भांडे मिळाले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा आणि वाचा भारतातील इतर मंदिरांविषयी....
बातम्या आणखी आहेत...