आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळीची पाने असतात अत्यंत शुभ, वाचा केळीशी संबंधित खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केळीच्या झाडाला प्राचीन काळापासून पूज्य आणि पवित्र मानले गेले आहे. सनातन धर्मामध्ये केळीचे झाड पूजनीय मानण्यात आले आहे. केळीचे फळं, पानं पूजेमध्ये उपयोगात आणले जातात. हे शुभ आणि पवित्रतेचे प्रतिक आहे. केळीच्या झाडामध्ये देवगुरु बृहस्पतीचा वास मनाला गेला आहे. शास्त्रानुसार सात गुरुवार नियमितपणे केळीची पूजा केल्यास साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मुलींना उत्तम वर प्राप्त होतो.

केळीचे झाड आणि पानांचे महत्त्व -
प्रत्येक पूजन कर्मामध्ये केळीच्या पानांचा उपाय केला जातो. ऋषीपंचमीच्या दिवशी केळीच्या पानावर चंदनाने सप्तऋषीचे चिन्ह काढून पूजा केली जाते. श्रीसत्यनारायण कथेमध्ये केळीच्या पानांचा मंडप केला जातो. दक्षिण भारतामध्ये केळीच्या पानावर जेवण केले जाते.

पलाशपद्मनीचूतकदलीहेमराजते।
मधुपत्रेषु भोक्तव्यं ग्रासमेकं तु गोफलम्॥

अर्थ - पलाश, पद्मिनी (कमळ), आंबा आणि केळीच्या पानांपासून तयार केलेली पत्राळ, सोने आणि चांदीच्या ताटात केलेले जेवण लाभप्रद राहते.

पुढे जाणून घ्या, केळीच्या झाडाचा सामान्य पूजन विधी...