आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सह्याद्रीशीर्षे विमलवसंते
गोदावरीतीर पवित्र देशे
यत् दर्शनात पातकं आशुनाशं
प्रयति तं त्र्यंबकं ईशमीडे।

असा उल्लेख पुराणांमध्ये श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या वर्णनार्थ आलेला आहे. येथील शिवलिंगाची स्थापना गौतम ऋषींनी पार्थिव लिंग म्हणून केल्याचा उल्लेख आढळतो.

1710 मध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. येथील मंदिराभोवती सव्वाचार फूट जाडीचा कोट बांधण्यात आला असून, त्याची दक्षिणोत्तर लांबी 218 फूट, पूर्व-पश्चिम 265 फूट, आणि उंची 90 फूट आहे. तत्कालीन बांधकामाची ‘मेरू माळवा’ पद्धत वापरण्यात आलेल्या या मंदिराच्या पूर्ण बांधकामाला सलग 30 वर्षे लागली. श्रीमंत पेशवे बाळाजी बाजीराव यांनी नानासाहेब पेशवे यांच्या देखरेखीखाली या मंदिराचे बांधकाम शके 1677 मध्ये सुरू करून शके 1708 मध्ये ते पूर्ण केले. 31व्या वर्षापर्यंत त्याकाळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बांधकामासाठी एकूण 9 ते 10 लाख रुपये खर्च आल्याची नोंद आहे.

या ज्योतिर्लिंगाचे पूजन अव्याहतपणे सुरू राहावे, यासाठी जमिनी इनाम देण्यात आल्या असून, त्याची व्यवस्था पेशव्यांनी लावली. येथील ज्योतिर्लिंगासह भाविक ब्रह्मगिरी या पर्वताची मनोभावे भक्ती करतात. महाशिवरात्रीच्या उत्सवकाळात मंदिर दिवसरात्र उघडे ठेवले जाते. दिवसभर संस्थानाच्या पूजेव्यतिरिक्त भाविकांतर्फे ज्योतिर्लिंगास अभिषेक, पूजा, सप्तधान्यपूजा, शृंगारपूजा, बेलपत्र अर्पण करून शिवजप केला जातो. त्रिकाल पूजेव्यतिरिक्त संस्थानातर्फे विशेष पूजा रात्री होते. दुपारी 3 ते 5 या काळात सुवर्णमूर्तीची पालखी काढली जाते.
- कावेरी कमलाकर अकोलकर, त्र्यंबकेश्वर