आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 मूर्ती : यांना स्पर्श केल्याने, पहिल्याने किंवा पूजा केल्यास दूर होऊ शकते Bad Luck

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन काळी जलंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता. या राक्षसाचे लग्न वृंदा नावाच्या एका मुलीशी झाले. वृंदा भगवान विष्णूची भक्त होती. वृंदाच्या पतिव्रता धर्मामुळे जलंधर अजेय झाला होता. या राक्षसाने एका युद्धामध्ये महादेवालाही पराभूत केले होते. या गोष्टीचा जलंधरला खूप अहंकार आणि गर्व झाला होता. तो स्वर्गातील देवतांना, अप्सरांना त्रास देवू लागला. दुःखी होऊन सर्व देवता भगवान विष्णूला शरण गेले आणि जलंधरच्या त्रासातून मुक्त करण्याची प्रार्थना करू लागले.

भगवान विष्णू यांनी आपल्या माया शक्तीने जलंधरचे रूप धारण केले. माया शक्तीने त्यांनी वृंदाचा पतिव्रता धर्म नष्ट केला. यामुळे जलंधरची शक्ती क्षीण झाली. युद्धामध्ये तो मृत्युमुखी पडला. जेव्हा वृंदाला भगवान विष्णूच्या छळ-कपाटाबद्दल समजले तेव्हा तिने विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला. देवतांच्या प्रार्थनेनंतर वृंदाने शाप परत घेतला, परंतु भगवान विष्णू वृंदासोबत केलेल्या छळ-कपाटामुळे स्वतःला दोषी समजत होते. त्यांनी वृंदाच्या शापाचा मान ठेवण्यासाठी स्वतःचे एक रूप दगडामध्ये प्रकट केले. या दगडातील रुपाला शाळिग्राम म्हटले जाते.

भगवान विष्णूने वृंदाला सांगितले की, पुढील जन्मात तू तुळशीच्या रुपात प्रकट होशील आणि लक्ष्मीपेक्षा मला जास्त प्रिय राहशील. तुझे स्थान माझ्या डोक्यावर असेल. मी तुझ्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही. याच कारणामुळे भगवान विष्णूच्या प्रसादामध्ये तुळशीचे पान अवश्य टाकले जाते. तुळस न टाकलेला प्रसाद भगवान विष्णू स्वीकार करत नाहीत. भगवान विष्णूला दिलेला शाप परत घेतल्यानंतर वृंदा जलंधरसोबत सती झाली. वृंदेच्या राखेमधून तुळशीचे रोप बाहेर आले. वृंदाची मर्यादा आणि पवित्रता कायम ठेवण्यासाठी देवतांनी भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपाचे लग्न तुळशीसोबत केले.

याच कारणामुळे भगवान विष्णू आणि तुळस कोणत्याही ठिकाणी असल्यास दुःख, अडचणी, त्रासामधून मुक्ती मिळते. नारायण स्वरूप हेच शाळीग्राम दगड विष्णूच्या वेगवेगळ्या रूप आणि अवतारांच्या नावाचे असतात. हे खूप चमत्कारिक दगड मानले गेले आहेत. या दगडांना केवळ स्पर्श केला तरी प्रत्येक कामात यश मिळते.
कोठे मिळतात शाळिग्राम - शाळिग्रामला भगवान विष्णूचे रुप मानले जाते. ज्याप्रमाणे महदेवाची शिवलिंग स्वरुपात पूजा केली जाते, त्याचप्रमाणे भगवान विष्णूची शाळिग्राम रुपात पूजा केली जाते. नेपाळमध्ये मुक्तनाथ येथे गंडकी नदीत पुष्कळ शाळिग्राम आढळतात. शाळिग्रामावरील मुखे व चक्रे यांवरून त्याची परीक्षा करतात. याचे 89 प्रकार असून रंगावरून याच्या प्रकारांना पुढील नावे दिली आहेत : शुभ्र पांढरा –वासुदेव, निळा–हिरण्यगर्भ, काळा –विष्णू, गडद हिरवा–श्रीनारायण, तांबडा –प्रद्युम्न आणि गडद निळा – नरसिंह किंवा वामन. बारा चक्रे असलेल्या शाळिग्रामाला अनंत म्हणतात.

पुढील स्लाइड्समध्ये पाहा शाळिग्रामच्या अशा अवतारांचे फोटो, ज्यांना स्पर्श, पूजा केल्याने सर्व अडचणी दूर होतात...