आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयपूरमधील \'अमरनाथ\', भगवान परशुराराने संतापाच्या भरात केला होता आईचा वध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: उदयपूर येथील गुहेतील परशुराम महादेव मंदिर )

उदयपूर- राजस्थानातील उदयपूर या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक किल्ले आणि प्राचिन मंदिरे या शहरा दिसतात. कुंभलगडजवळ परशुराम महादेवाचे जागृत मंदिर आहे. परशुरामाने संतापाच्या भरात माता रेणुकाचा वध केला होता. आज महाशिवरात्रीनिमित्त उदयपूर येथील गुहेतील भगवान शिव मंदिराच्या निर्मितीविषयी एक पौराणिक कथा सांगणार आहोत.
पृथ्वीवरील क्षत्रियांचा विनाश कण्‍यासाठी परशुरामाला अद्भुत शक्ती प्राप्त झाली होती. या गुहेत असलेल्या मंदिरात एक स्वयं भू शिवलिंग आहे. या ठिकाणी विष्णुचा सहावा अवतार परशुरामाने भगवान शिवाची अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली होती. विशेष म्हणजे ही गुहा खुद्द परशुरामाने आपल्या फरशुने खडक फोडून तयार केली होती, असे सांगितले जाते.

दुर्गम डोंगराळ भूप्रदेश आणि घाटाचा रस्ता यामुळे या प्राचीन स्थळाला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. यामुळे भाविकांनी या मंदिराला मेवाडचे अमरनाथ असे नाव दिले आहे.
राजस्थानमध्ये मेवाड आणि मारवाड ही दोन स्थळे एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. कदाचित त्यामुळेच दरवर्षी श्रावण महिन्यात येथे भाविकांची मोठी गर्दी होते. भाविक मनोभावे शिवशंकराचे दर्शन घेतात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, गुहेतील शिव मंदिरांशी संबंधित पौराणिक कथा...