आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मंदिराचे खांब तरंगतात हवेत, येथेच जटायूला मारले होते रावणाने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामधील विविध मंदिर त्यांच्या चमत्कार आणि कथामुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. आंध्रप्रदेशातील अनंतपुरमध्ये एक असेच मंदिर आहे, जे ऐतिहासिक आणि चमत्कारिक महत्त्वामुळे प्रसिद्ध आहे. येथील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिरांचे खांब कोणत्याही आधाराशिवाय हेवेत तरंगतात. या व्यतिरिक्त या मंदिराचा संबंध रामायण काळाशी आहे.

16 व्या शतकात झाले होते या मंदिराचे निर्माण
हे अनोखे मंदिर बंगळूरूपासून 100 किलोमीटर दूर आंध्रप्रदेशच्या अनंतपुर जिल्ह्यातील लेपाक्षी गावात आहे. ऐतिहासिक मान्यतेनुसार या मंदिराचे निर्माण 16 व्या शतकात करण्यात आले होते. या मंदिराला लेपाक्षी किंवा वीरभद्र मंदिर असेही म्हणतात. या मंदिराचे खांब हवेत तरंगतात. यामागे अशी मान्यता आहे की, या खांबाखालून वस्त्र निघाले तर मनुष्याची इच्छा पूर्ण होते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराशी संबंधित इतर काही खास गोष्टी...