आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे हनुमानाच्या पायाजवळ स्त्री रुपात बसले आहेत शनिदेव, वाचा रोचक कथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (22 एप्रिल, शुक्रवार) हनुमान जयंती आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमानाच्या एक अनोख्या मंदिराची माहिती देत आहोत. गुजरातमध्ये भावनगर येथील सारंगपूर येथे हनुमानाचे एक प्राचीन मंदिर आहे. जे कष्टभंजन हनुमान नावाने ओळखले जाते. हे मंदिर खूप खास मानले जाते कारण येथे हनुमानासोबत शनिदेव विराजित आहेत. एवढेच नाही तर येथे शनिदेव स्त्री रुपात हनुमानाच्या चरणाजवळ बसलेले आहेत. यामागे एक पौराणिक कथा आहे.

का हनुमानाच्या पायाजवळ स्त्री रुपात बसले आहेत शनिदेव
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी शनिदेवाचा प्रकोप खूप वाढला होता. या प्रकोपामुळे सर्व लोकांना दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागत होते. शनिदेवापासून मुक्ती मिळवण्यासाठी भक्तांनी हनुमानाकडे प्रार्थना केली. भक्तांचे दुःख ऐकून हनुमान शनीदेवावर क्रोधीत झाले आणि त्यांनी शनिदेवाला दंडित करण्याचा निश्चय केला. शनिदेवाला ही गोष्ट समजताच ते खूप घाबरले आणि हनुमानाच्या क्रोधापासून दूर राहण्यासाठी उपाय शोधू लागले. शनिदेवाला हे माहिती होते की, हनुमान बालब्रह्मचारी असून ते स्त्रियांवर हात उचलत नाहीत. यामुळे शनिदेवाने स्त्रीचे रूप धारण केले आणि हनुमानाच्या चरणाजवळ बसून क्षमा मागू लागले. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात शनिदेव हनुमानाच्या चरणाजवळ स्त्री रुपात आहेत. भक्तांचे कष्ट दूर केल्यामुळे या मंदिराला कष्टभंजन हनुमान मंदिर नावाने ओळखले जाते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंदिराशी संबंधित इतर काही खास गोष्टी...