आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Are Some Facts You Need To Know About Gudi Padwa

या कारणांमुळे गुढीपाडव्यापासूनच सुरु होते हिंदू नववर्ष, वाचा इतरही रोचक गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू नववर्ष चैत्र मासातील शुक्ल प्रतिपदेपासून सुरु होते. या वर्षाला हिंदू नव संवत्सर किंवा नव संवत असेही म्हणतात. आपल्या देशात नव्या वर्षाचा, संवत्सराचा प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या, तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. हा शालिवाहन शक सुरू करणारा राजा शालिवाहन महाराष्ट्रीय होता. भारतातील विविध भागांमध्ये हा दिवस गुढीपाडवा, उगादी इ. नावानी साजरा केला जातो. येथे जाणून घ्या, गुढीपाडव्याच्या दिवशीच का साजरे केले जाते हिंदू नववर्ष.

गुढी किंवा ब्रह्मध्वज हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. राम शालिवाहनाच्या विजयाप्रीत्यर्थ सृष्टीनिर्मितीच्या वाढदिवसाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारून आनंद साजरा केला जातो. शुष्क झालेली सृष्टी, पानगळ झाल्याने निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नवपालवीने फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सुस्वराने लागलेली असते. निसर्गातल्या परिवर्तनाचे, नवचैतन्याचे स्वागत दारी गुढी उभारून करावे, हाही एक उद्देश आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांतील एक सण मानला जातो.

पुढे वाचा, गुढीपाडव्यापासूनच का सुरु होते हिंदू नववर्ष, कडूनिंबाचे महत्त्व आणि इतर खास माहिती...