आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरु नानक जयंती : वाचा, शीख धर्माशी संबंधित काही Unknown Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्तिक पौर्णिमेला शीख समुदायाचे लोक श्री गुरू नानकदेवजी यांचा जन्मोत्सव साजरा करतात. पंजाबमध्ये स्थापन झालेला शीख धर्म उदात्त, समतेच्या शिकवणुकीमुळे आशिया, अमेरिका खंडात लोकांनी स्वीकारला आणि रुजला. आशिया खंडात श्री गुरू नानकदेवजी यांच्या काळातच शीख धर्माची पताका फडकली. गुरू नानकदेवजी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घ्या, गुरू नानकदेवजी यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी....

इ.स. 1469 मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री नानकदेवजी यांचा जन्म तलवंडी (पाकिस्तान) मध्ये झाला. त्यांचे वडील श्री कल्याणचंदजी तलवंडी गावचे पटवारी होते. सध्या या गावात नानकांना साहिब म्हणून ओळखले जाते. प्रेमळ, सहिष्णू स्वभावाचे श्री कल्याणचंदजी आणि माता तृप्ता यांच्या पोटी श्री गुरू नानकदेवजी यांचा जन्म झाला.

लहानपणापासून त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा आणि विश्लेषण करण्याच्या क्षमतेचा प्रत्यय येत असे. त्यांच्या घरी येणाऱ्या विद्वान पंडित आणि मौलाना यांच्याशी ते धार्मिक चर्चा करीत. लहानवयात ज्येष्ठ धर्मगुरूंशी धार्मिक वादविवादात नमवल्यामुळे श्री नानकदेवजींची कीर्ती लवकरच पसरू लागली. शीख संप्रदायाचे पहिले गुरू असलेले श्री गुरू नानकदेवजी यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्यामुळे त्यांनी अनुयायांचा प्रचंड गोतावळा गोळा केला. सध्या शीख धर्माचे अनुयायी जगभर पसरलेले आहेत. त्यामुळे जयंती जगभर कार्तिकी पौर्णिमेला साजरी केली जाते.

पुढे वाचा, केव्हा झाली शीख धर्माची स्थापना आणि कोण झाले धर्मगुरू...