आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utsav Chaitra Navratri On 31, You Know Why Are Important These Nine Days?

चैत्र नवरात्रीला प्रारंभ : जाणून घ्‍या काय आहे या नऊ दिवसांचे महत्त्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मानुसार वर्षात चार नवरात्र असतात. यामधील चैत्र व आश्वीन ही प्रमुख नवरात्र म्‍हणून ओळखली जातात. याशिवाय दोन गुप्‍त नवरात्र म्‍हणून ओळखल्‍या जातात. या नवरात्राबद्दल ब-याच लोकांना माहिती नसते. यावर्षीची चैत्र नवरात्र 31 मार्चला सोमवारी सुरू होणार आहे. चैत्र आणि आश्विन महिण्‍यात येणा-या नवरात्रीमध्‍ये काही समान बाबी आहेत. जाणून घ्‍या काय आहेत या महत्त्वाच्‍या गोष्‍टी.
ऋतुविज्ञानानुसार हे दोन महिने ( चैत्र व अश्विन) महत्त्वाची माणण्‍यात आली आहेत. 'शित' चे आगमन आश्विन महिण्‍यात होते तर ग्रीष्‍म ऋतुचे आगमन चैत्र महिण्‍यात होते. ऋतुमूलक बासंती संवत्‍सरा नुसार चैत्र महिना शुल्‍क प्रतिपदात येतो. या दरम्‍यान येणा-या नक्षत्राच्‍या महिन्यात शारदा ऋतुतील आश्विन शुक्‍लाची सुरूवात होते. या दोन महिन्‍यात येणा-या संवत्‍सरामध्‍ये येणारे नऊ दिवस 'नवरात्र' म्‍हणून ओळखले जातात.
'नव' हा शब्‍द नवीन आर्थ आणि नऊ या संखेचा रूपक शब्‍द म्‍हणून ओळखला जातो. भारत हा कृषीप्रधान देश असल्‍यामुळे पिकांच्‍या दृष्‍टीकोणातून आश्विन व चैत्र या मराठी महिण्‍याला विशेष महत्त्व आहे. चैत्रा मध्‍ये घेण्‍यात येणारी रब्बीची पिके घरात आणली जातात. या काळातील नऊ दिवस माता दुर्गेची पूजा केली जाते.