आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utsav Hindu New Year Is A Special Celebration, Tradition, Know What Is.

जाणून घ्‍या: हिंदू नववर्ष उत्‍सवाचे काय आहे महत्त्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत हा विविध जाती-धर्मांचा देश असल्‍यामुळे प्रत्‍येक दिवशी पारंपरीक कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते. वेगवेगळ्या राज्‍यातील वेगवेगळी संस्‍कृती असल्‍यामुळे प्रत्‍येकाची उत्‍सव साजरा करण्‍याची परंपरा वेगळी आहे. हिंदू धर्माचे नविन वर्ष गुढीपाडव्‍याला ( चैत्र शुल्‍क प्रतिपदा) सुरू होते. महाराष्‍ट्रा या वर्षाचे स्‍वागत गुढी उभारून महाराष्‍ट्रात केले जाते. इरत राज्‍यात वेगवेगळ्या पध्‍दतीने नव वर्षाची सुरूवात केली जाते. वृंदावनामध्‍ये पाडव्‍यानिमित्त श्रीराम मंदिरात 10 दिवसांचा ब्रह्मोत्‍सव साजरा केला जातो. यानिमि‍त्ताने श्रीरामाच्‍या पालखीची प्रत्‍येक दिवशी मिरवणूक काढली जाते.
या काळात श्रीरामाच्‍या मंदिरात पारायणाचे कार्यक्रम आयोजीत केले जातात. वृंदावनाच्‍या कात्‍यायनीपीठात बृह्मोत्‍सव साजरा केला जातो. चैत्र कृष्‍ण नवमीच्‍या निमित्ताने दक्षिणी शैलितील श्रीरंगनाथ-गोदाम्‍बाच्‍या यात्रेसाठी रथ सजवला जातो. या रथाला मेला नावाने ओळखले जाते. दशमीच्‍या रात्री फटाक्‍याची आतिशबाजी केली जाते.