महाशिवरात्रीला घ्‍या घर / महाशिवरात्रीला घ्‍या घर बसल्‍या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन

Feb 27,2014 10:50:00 AM IST
उत्तरेतील केदारनाथपासून दक्षिणेत रामेश्वरपर्यंत बारा ज्योतिर्लिंगांचे वर्णन अनेक पुराणांमध्ये आढळते. कल्याणकारक शिवाचे प्रतीक म्हणजे लिंग’, ‘ज्योती म्हणजे यज्ञशिखा आणि त्याचे प्रतीक म्हणजे लिंग’, तर द्वादशादित्याची सगुण प्रतीके मानलेली ही ज्योतिर्लिंगे वैज्ञानिकांच्या मते सुप्त ज्वालामुखीची उद्रेकस्थाने असावीत. या 12 ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्रांचा देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेची जडणघडण करण्यात मोठा वाटा आहे.
मानवी संस्कृती जिथे पोहोचली तिथपर्यंत तीर्थक्षेत्रांची व्याप्ती दिसून येते. ‘तीर्थते अनेन इति’ किंवा ‘तरति पापादिकं यस्मात्’ अशी तीर्थक्षेत्रांची व्याख्या आढळते. भौगोलिक प्रभाव, गंगा नदीचे सान्निध्य, ऋषी-मुनी-संतांची तपोभूमी आणि भगवंताच्या अवतार कथा अशा विविध संदर्भांनी तीर्थक्षेत्रांची उत्पत्ती मानली जाते. असंख्य तीर्थ आणि क्षेत्रांनी नटलेल्या, गजबजलेल्या आपल्या देशात तीर्थक्षेत्र यात्रांची परंपरा दीर्घ काळापासून चालत आलेली आहे. या यात्रेत चार धाम, अष्टविनायक, द्वादश ज्योतिर्लिंगे या यात्रा विशेष पवित्र मानल्या जातात.
वेदकाळापासून रुद्रदेवतेचे संदर्भ दिसून येतात. ‘रोदयन्ति सर्वमन्त कालेति रुद्र:’ असे ऋग्वेद काळातील रुद्र, पशुपति, योगेश्वर, महादेव, त्र्यंबक आदी अनेक नावांनी श्रीशंकराचे वर्णन विविध ग्रंथांतून केलेले आढळते. पतंजली, सांख्य, गौतमांनी न्यायशास्त्राचे प्रवर्तन केले. पाणिनी व्याकरणाच्या चौदा माहेश्वर सूत्रांची रचनाही शिवाच्या डमरू वादनातून झाल्याचे मानले जाते. प्राचीन काळापासून अर्धनारीनटेश्वर, नटराज, कल्याण अशी अनेक चित्रे-शिल्पे सर्वत्र आढळतात. असे असले तरी शिवलिंगरूपात शिवाची पूजा अधिक प्रचलित आहे.
मूले ब्रह्मा तथा मध्ये विष्णुस्थिभुवनेश्वर: ।
रुद्रोपरी महादेव: प्रणवाख्य: सदाशिव: ।।
लिंगवेदी महादेवी लिंगं साक्षान्महेश्वर: ।
तथोसम्पूजनान्नित्यम् देवीदेवश्च पूजितौ ।।
मूळभाग ब्रह्म, मध्यभाग विष्णू आणि ऊर्ध्वभाग प्रणवरूप रुद्र, लिंगवेदी (अर्थात शाळुंका म्हणजे पार्वती व लिंग म्हणजे साक्षात महेश्वर) असे सयोनिलिंगाचे वर्णन लिंगपुराणात येते. त्यामुळे लिंगपूजेने सर्व देवदेवतांच्या पूजेचे फळ प्राप्त होते, असे सांगितले जाते. सदाशिवाच्या शिवक्षेत्रांपैकी बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानांचे विशेष महत्त्व आहे. 11 ज्योतिर्लिंग स्थाने अकरा रुद्रांची, तर शिवाच्या आदिमायेचे व्यक्तरूप योनिर्लिंग अर्थात ब्रह्मा, विष्णू, शिव सांगण्यात येते. असा हा विद्यांचा ईश्वर, सर्व भूतांचा अधिपती, ब्रह्म, वीर्यबलाचा प्रतिपालक, परब्रह्म, परमात्मा, सच्चिदानंद शिव आम्हा सर्वांसाठी सदा मंगलमय राहो, अशी
महाशिवरात्रीनिमित्त प्रार्थना
ईशान: सर्वविद्यानामीश्वर: सर्वभूतानां
ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणोधिपतिर्ब्रह्मा शिवोमेऽस्तु सदाशिवोम्
- कैलाशचंद्र शिखरे, त्र्यंबकेश्वर
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि घ्‍या बारा ज्‍योतिर्लिंगाचे दर्शन
सोमनाथ गुजरातमधील सौराष्ट्र प्रांतात अरबी समुद्राकाठी सोमनाथ हे ज्योतिर्लिंग वसलेले आहे. या ज्योतिर्लिंगाला सोरटी सोमनाथ असेही म्हटले जाते.मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी कर्दळी वनाजवळ श्रीशैल पर्वतावर हे ज्योतिर्लिंग आहे.महाकालेश्वर भोपाळपासून 250 कि.मी. अंतरावर उज्जैन येथे क्षिप्रा नदीकाठी हे ज्योतिर्लिंग आहे. उज्जैनी महाकालेश्वरनगरी म्हणून परिचित आहे.ओंकारेश्वर विंध्याचल आणि सातपुडा यामधील मेकल पर्वतावर कावेरी-नर्मदा तीरावर ओंकारेश्वर व अमरेश्वर हे एकत्र ज्योतिर्लिंग आहे.केदारनाथ हरिद्वारपासून 230 कि.मी. अंतरावर गढवाल जिल्ह्यात हे ज्योतिर्लिंग आहे. समुद्रसपाटीपासून 12 हजार मीटर उंच आहे. हे चारधाम यात्रेतील उत्तरधाम मानले जाते.भीमाशंकर पुणे शहराजवळ भीमा नदीच्या तीरावर भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. गर्द वनराई, अनेक वनौषधी, पशू-पक्ष्यांनी समृद्ध पर्वतावर हे ज्योतिर्लिंग आहे.विश्वनाथ वाराणसी (काशी) क्षेत्रात गंगा नदीकाठी हे ज्योतिर्लिंग आहे. धर्मपीठ आणि विद्यापीठ असा दुहेरी महिमा येथे आहे.श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक शहरापासून सुमारे 30 किलोमीटरवर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी, गोदावरी नदीच्या तीरावर त्र्यंबकेश्वर हे महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. ‘दक्षिणेतील गंगा’; संबोधली जाणारी गोदावरी नदी येथूनच उगम पावते.वैजनाथ बीड जिल्ह्यातील परळी या गावी ब्रह्मा-वेणू-सरस्वती या त्रिवेणी संगमाजवळ हे ज्योतिर्लिंग आहे. बहारमधील देवघर (संथाल परगणा) येथेही वैजनाथ नावाचे ज्योतिर्लिंग आहे.नागेश्वर ज्योतिर्लिंगरामेश्वरम भारताच्या दक्षिण टोकाला समुद्रकाठावर श्रीरामचंद्राने स्थापन केलेले हे ज्योतिर्लिंग असल्याचे बोलले जाते.घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा पूर्ण होत असल्याचे मानतात. औरंगाबादपासून 30 कि.मी.वर एलगंगा नदीकाठी वेरूळ गावी हे क्षेत्र आहे.
X