हनुमान आहे महादेवाचा / हनुमान आहे महादेवाचा सर्वश्रेष्ठ आवतार, या घटनेमुळे महादेव शक्तीशाली झाले

Feb 26,2014 10:29:00 AM IST
शिव महापुराणात महादेवाचे अनेक अवतार सांगितले आहेत. विविध अवतारातून महादेवाने दृष्टांचा संहार करून धर्माची रक्षा केली. त्रेतायुगात रामाला मदत करण्यासाठी आणि दृष्टांचा नाश करण्यासाठी महादेवाने हनुमानाचा अवतार घेतला. हनुमान अवतार हा महादेवाचा सर्वश्रेष्ठ अवतार असल्याचे सांगितले जाते.
या अवतारामध्ये महादेवाने वानराचे रूप धारण केले होते. लहानपणापासूनच हनुमान शक्तीशाली होता. मात्र त्याच्या जीवनात घडलेल्या एका घटनेमुळे तो अधिक बलशाली झाला. लहान असताना सूर्य हे फळ आहे असे समजून ते खाण्यासाठी हनुमान सूर्याच्या दिशेने झेपावला तेव्हा इंद्र घाबरला आणि रागात येऊन त्याने वज्राने हनुमानावर प्रहार केला.
याचा राग आल्याने पवनदेवाने वारा बंद केला. तेव्हा ब्रम्ह देवाने हनुमानाला चैतन्य प्रदान केले आणि सर्व देवांनी हनुमानाला वरदान दिले त्यामुळे हनुमान शक्तीशाली झाला. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर( 27फेब्रुवारी ) महादेवाचा अवतार आसणा-या हनुमानाविषयी काही रंजक गोष्टी आम्ही आज सांगत आहोत.
हनुमान शक्तीशाली का झाला हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
सूर्याने त्याच्या तेजापैकी सव्वा भाग तेज दिले आणि सांगितले, की मी ज्याला हनुमानामध्ये शास्त्राचे शिक्षण घेण्याची शक्ती येईल तेव्हा मी त्याला शास्त्राचे ज्ञान देईल त्यानंतर त्याच्या एवढे शस्त्रज्ञान कोणाकडेही असणार नाही.-यमाने हनुमानाला निरोगी राहण्याचा आर्शिवाद दिला. कुबाराने हनुमानाला युद्धात कधीही न हरण्याचे वरदान दिले आणि त्याची गदाही हनुमानाचा वध करू शकत नाही असे सांगितले. - माझे कुठलेच शस्त्र याचा वध करू शकणार नाही, असा महादेवाने हनुमानाला आर्शिवाद दिला. देवशिल्पी विश्वकर्माने त्याने तयार केलेल्या कुठल्याच अस्त्राने हनुमानाचा वध होणार नाही आणि तो सदैव ब्रह्मचारी राहील असा आर्शिवाद दिला.- इंद्रानेही वज्रानेही हनुमनाचा वध होणार नाही असे वरदान दिले. - दहा लाख वर्ष वय झाल्यानंतरही या बालकाचा पाण्यामुळे मृत्यू होणार नाही असा वरूण देवाने हनुमानाला आर्शिवाद दिला. - हा बालक दीर्घयूष्यी महात्मा होईल असा ब्रह्मदेवाने वरदान दिले. युद्धात या बालकाला कोणीही हारवू शकणार नाही. इच्छेप्रमाणे रूप धारण करू शकेल असाही ब्रह्मदेवाने आर्शिवाद दिला. हनूमानाच्या आयुष्याविषयी अशाच रंजक गोष्टी वाचा पुढील स्लाइडवर...- सर्व विद्या आत्मसाद केल्यानंतर हनुमान स्वर्गाचा मंत्री बनला. हनुमानानेच पत्नीच्या शोधात फिरणा-या रामाची आणि सुग्रीवाची मैत्री घडवून आणली. माता सितेच्या शोधात समुद्रापार लंकेत जाऊन हनुमानाने तेथेही पराक्रम केला. राम रावण युद्धातही हनुमानाने पराक्रम दाखवला आणि संजीवनी बूटी आणून लक्ष्मणाचा जीव वाचवला. याप्रकारे हनुमान आवतार धारण करून महादेवाने परम भक्त रामाची सेवा केली.
X