आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasant Panchami On 24 Know Why This Day Worship Of Goddess Saraswati

24 ला वसंत पंचमी : जाणून घ्या, का केली जाते या दिवशी देवी सरस्वतीची पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माघ मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमीचे पर्व मानले जाते. यादिवशी ज्ञानदेवता म्हणजे माता सरस्वतीची पूजा केली जाते. येत्या 24 जानेवारी रोजी, शनिवारी वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. हे पर्व साजरे करण्यामागे अनेक धार्मिक कथा आहे. त्यापैकी एक अशी आहे -
पुराण कथेतील मान्यतेनुसार, ज्यावेळी ब्रह्मदेवाने भगवान विष्णुच्या आज्ञानुसार सृष्टिची रचना केली. त्यानंतर मनुष्याची रचना केली. पण, मनुष्याच्या रचना केल्यानंतर ब्रह्मदेवला काहीतरी कमतरता राहिल्याचे जाणवले, मनुष्याची रचना केल्यानंतर देखील सगळीकडे मौन (शांती) पसरली आहे असे ब्रह्मदेवाच्या लक्षात आले. यानंतर भगवान ब्रह्मदेवाने विष्णुंची अनुमति घेवून एका चर्तुभुजी स्त्रीची रचना केली, जिच्या एका हातात वीणा तर दुसरा हात वर मुद्रेत होता. इतर दोन्ही हातांमध्ये पुस्तक आणि माळा होत्या. यानंतर ब्रह्मदेवाने देवीला वीणा वाजवण्याची विनंती केली. जसे देवीने वीणा वाजवण्यास सुरूवात केली तसे संसारातील सर्व जीव-जतुंना वाणी प्राप्त झाली. तेव्हापासून ब्रह्माने त्या देवीला वाणी देवी सरस्वती असे संबोधले.
सरस्वतीची भगवती, शारदा, वीणावादिनी आणि वाग्देवी यासारख्या अनेक नावांनी पुजा केली जाते. ही देवी विद्या आणि बुद्धि प्रदान करते. संगीताची उत्पत्ति केल्याने यादेवीला संगीताचीदेवी देखील म्हटले जाते. वसंत पंचमीचा दिवस हा देवीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. ऋग्वेदात देखील देवी सरस्वतीचे वर्णन करण्यात आले आहे. या देवीची समृद्धि आणि स्वरूपाचे वैभव अद्भुत आहे. पुराणकथेनुसार श्रीकृष्णाने सरस्वतीवर खुश होऊन तिला वरदान दिले होते की, वसंत पंचमीच्या दिवशी तुझी आराधना केली जाईल. त्यामुळे यादिवशी देवी सरस्वतीची आराधना आणि पुजा करण्याची प्रथा आहे.