आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यमाने सावित्रीला सत्यवानाच्या प्राणाशिवाय दिले होते तीन वर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वटपौर्णिमा हा सण आला की, आपल्या डोळ्यांसमोर वटवृक्षाची पूजा करणारी सुवासिन, 108 प्रदक्षिणा घालून माझे सौभाग्य अखंड ठेव, असे म्हणून व्रतवैकल्ये करणारी भारतीय स्त्री उभी राहते. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे.

या संदर्भात पुराणात पुढीलप्रमाणे कथा आहे. अश्वपती या राजाची एकुलती लाडकी कन्या सावित्री उपवर झाली तेव्हा त्याने तिला पती निवडण्याचा अधिकार दिला. यावरून त्या काळात स्त्री स्वातंत्र्य आणि सन्मान होता, ही बाब लक्षात येते. सावित्रीने एका देखण्या, निर्धन, गरीब अशा सत्यवान या तरुणाची पती म्हणून निवड केली. सात्विक व विश्वासू वृत्ती असल्याने दरबारातील काही व्यक्तींनी गैरफायदा घेऊन त्यांचे राज्य गिळंकृत केले होते. सत्यवान आई-वडिलांना घेऊन रानावनात भटकत होता. विवाह ठरल्यानंतर नारद मुनींनी सावित्रीचे मन बदलण्याचा प्रयत्न केला. सत्यवान अल्पआयुष्यी आहे, एक वर्ष त्याचे आयुष्य आहे, तू लग्न करू नकोस, असे समजावले. पण ती आपल्या विचारापासून ढळली नाही.
पुढे वाचा, सत्यवानाशी विवाह झाल्यानंतर...