आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : येथे मद्यप्राशन करतात काळभैरव, कुठे जाते मद्य अजूनही एक रहस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशात असे अनेक मंदिर आहेत, ज्यांचे रहस्य अजूनही उलगडलेले नाहीत. असेच एक काळभैरवाचे मंदिर मध्य प्रदेशातील उजैन शहरात स्थित आहे. या मंदिरातील चमत्कारिक गोष्ट म्हणजे, येथे स्थित असलेले भगवान काळभैरव मद्यप्राशन करतात. मद्यप्राशन करणाऱ्या काळभैरवाला पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो भाविक येथे येतात.

हे अद्भुत दृश्य दिव्य मराठी डॉट कॉमच्या वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी जीवनमंत्र टीमने काळभैरव मंदिरात जाऊन एक्सक्लूझिव्ह व्हिडिओ आणि फोटो क्लिक केले आहेत. तसेच काळभैरव मंदिराचे पुजारी पं. ओमप्रकाश चतुर्वेदी यांच्याशी खास चर्चा केली.

मंदिराचे पुजारी पं. ओमप्रकाश चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार या मंदिराचे वर्णन स्कंदपुराणातील अवंती खंडात मिळते. पं.चतुर्वेदीनुसार या मंदिरात भगवान काळभैरवाच्या वैष्णव स्वरूपाचे पूजन केले जाते. या मंदिराशी संबंधित विविध कथा प्रचलित आहेत. उज्जैनचे राजा महाकाल यांनीच काळभैरवाला शहराच्या रक्षणासाठी नियुक्त केले आहे. यामुळे काळभैरवाला शहराचा कोतवाल असेही संबोधले जाते. काळभैरव अष्टमी (14 नोव्हेंबर, शुक्रवार) निमित्त आम्ही तुम्हाला या मंदिरा संदर्भातील कशी खास गोष्टी सांगत आहोत.

येथे मद्यप्राशन करतात काळभैरव
भगवान काळभैरवाचे मंदिर क्षिप्रा नदीच्या किनारी भैरवगढ क्षेत्रामध्ये स्थित आहे. या मंदिरातील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे, येथे काळभैरव मूर्तीला मद्याचा नैवेद्य दाखवला जातो. चकती करणारी गोष्ट म्हणजे ज्या पात्रात मद्याचा नैवेद्य दाखवला जातो ते पाहता पाहता रिकामे होते. मद्य कोठे जाते, हे रहस्य आजही उलगडलेले नाही.

मद्य अर्पण करताना मनामध्ये असा भाव असावा...
पं. चतुर्वेदी यांनी सांगितले की, काळभैरवाला मद्य अर्पण करताना आपण आपल्यामधील सर्व वाईट गोष्टी समर्पित करत आहोत असा भाव मनात ठेवावा. नेहमी सत्याच्या आणि प्रामाणिक मार्गाचा अवलंब करण्याचा संकल्प करावा. मदिरा, मद्य म्हणजेच सुरा हे ही शक्तीचे स्वरूप आहे. या शक्तीचा उपभोग करू नये. जो व्यक्ती याचा उपभोग घेतो, तो पथभ्रष्ट होतो.

रिपोर्ट - शशिकांत साळवी/ मनीष मेहरेले

पुढे व्हिडिओमध्ये पाहा मद्यप्राशन करणारे काळभैरव आणि वाचा....
- एक दशकापूर्वी मंदिराच्या चारही बाजूला झाले होते खोदकाम
- मद्य अर्पण केल्याने दूर होतो राहू दोष
- एकहजार वर्षांपूर्वी झाले होते जीर्णोद्धार
- सिंधिया कुटुंबाकडून येते पगडी
- काळभैरव मंदिरात आहेत पाताळ भैरवही
- तंत्र क्रियांसाठी प्रसिद्ध आहेत विक्रांत भैरव