आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijaya Dashami Durga Idol Immersion And Weapons Worship Method

दसरा आज : या विधीने करा दुर्गा विसर्जन आणि शस्त्र पूजा, शुभ मुहूर्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार अश्विन मासातील दशमी तिथीला विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातो. पुराणानुसार या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता. वाईटावर चांगल्याचा विजयाच्या आनंदात हा सण संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो. या वर्षी हा सण 22 ऑक्टोबर, गुरुवारी आहे. दशमी तिथीला दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते तसेच या दिवशी भगवान श्रीरामाची आणि शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. येथे जाणून घ्या, दुर्गा विसर्जनाचा संपूर्ण विधी....

विसर्जनापूर्वी दुर्गा देवीच्या मूर्तीची गंध, अक्षता, फुल अर्पण करून पूजा करा तसेच खालील मंत्राचे स्मरण करा...
रूपं देहि यशो देहि भाग्यं भगवति देहि मे।
पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे।।
महिषघ्नि महामाये चामुण्डे मुण्डमालिनी।
आयुरारोग्यमैश्वर्यं देहि देवि नमोस्तु ते।।

त्यानंतर हातामध्ये अक्षता, फुल घेऊन देवी भगवतीचे या मंत्राचा उच्चार करून विसर्जन करावे...
गच्छ गच्छ सुरश्रेष्ठे स्वस्थानं परमेश्वरि।
पूजाराधनकाले च पुनरागमनाय च।।

अशाप्रकारे विधीव्रत पूजन केल्यानंतर देवीच्या मूर्तीचे विसर्जन करावे.

22 ऑक्टोबरला सर्व मुहूर्त अशाप्रकारे आहेत. या मुहूर्तावर तुम्ही तुमच्या सोयीनुसार दुर्गा विसर्जन, शस्त्र पूजा, श्रीरामाची पूजा करू शकता.

सकाळी 6:30 पासून 8:00 पर्यंत - शुभ
सकाळी 10:50 पासून 12:00 पर्यंत - चल
सकाळी 11:45 पासून दुपारी 12:25 पर्यंत - विजय मुहूर्त
दुपारी 12:00 पासून 01:37 पर्यंत - लाभ
संध्याकाळी 4:30 पासून 6:00 पर्यंत - शुभ
संध्याकाळी 6:00 पासून 7:30 पर्यंत - अमृत
संध्याकाळी 7:30 पासून रात्री 9:00 पर्यंत - चल

शस्त्र पूजनाचा विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....