आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinayki Chaturthi Tomorrow Do This Fast By This Method.

विनायकी चतुर्थी उद्या : या सोप्या पध्दतीने करा उपवास...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणपतीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला हा व्रत केला जातो. याला विनायकी चतुर्थी उपवास देखील म्हटले जाते. यावेळी हा उपवास रविवार 15 नोव्हेंबरला आहे.
अशा प्रकारे करा पूजन विधि
रविवारी सकाळी लवकर उठून स्नान आदि कामे लवकर करा. दुपारच्या वेळी आपल्या इच्छे प्रमाणे सोने, चांदी, तांबे, पीतळ किंवा मातीची गणपतीची मूर्ती स्थापन करा. संकल्प मंत्रानंतर गणपतीची पूजन-आरती करा. गणपतीच्या मूर्तीवर सिंन्दूर चढवा. गणपती मंत्र(ओम गणपतयै नमः) म्हणत 21 दूर्वा दल चढवा. गुळ किंवा बुंदीच्या 21 लाडवांचा नैवेद्य दाखवा. यामध्ये 5 लाडू मूर्ती जवळ ठेवा आणि 5 ब्राम्हणाला दान करा. उरलेले लाडू प्रसाद म्हणून वाटा. पूजामध्ये श्रीगणेश स्त्रोत, अथर्वशीर्ष, संकटनाशक स्त्रोत आदिंचे पाठ करा. ब्राम्हणांना जेऊ घाला आणि त्याना दक्षिणा प्रदान केल्यानंतर संध्याकाळी स्वतः भोजन करा. शक्य असेल तर उपवास करा. या उपवासाचे आस्था आणि श्रध्देने पालन केल्याने गणपतीच्या कृपेने इच्छा पुर्ण होतात आणि जीवनात निरंतर यश मिळते.

या उपायाविषयी सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...