आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा एक गव्हाचा दाणा आहे पांडवांची निशाणी, वजन जवळपास 150 ग्रॅम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत काळचा इतिहास जवळपास 5000 वर्षे जुना झाला आहे. त्या काळात द्वापार युग चालू होते आणि आता कलियुग आहे. पांडवांनंतरच कलियुगाला सुरुवात झाली होती. त्या काळातील विविध गोष्टी वेगवेगळ्या शोधांमधून देशाच्या अनेक भागात सापडल्या आहेत. पांडव अज्ञातवासात असताना हिमाचल प्रदेशातील करसोग घाटीतील गावामध्ये वास्तव्यास होते. असे मानले जाते की, त्या काळातील एक गव्हाचा दाणा आजही येथील ममलेश्वर महादेव मंदिरात ठेवण्यात आला आहे. या गव्हाच्या दाण्याचे वजन जवळपास 150 ग्रॅम आहे.

येथील प्रचलित मान्यतेनुसार, याच मंदिरात पाच पांडवांचे पाच शिवलिंग स्थापित आहेत. हा पाचही शिवलिंगांचे पूजन केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जो व्यक्ती या शिवलिंगावर नियमितपणे जल अर्पण करतो त्याला महादेवाची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. या क्षेत्रामध्ये एक प्राचीन ढोल आहे. हा ढोल शक्तिशाली भीमचा असल्याचे मानले जाते.

पुढे पाहा -
भीमाचा ढोल आणि पांडवांनी स्थापित केलेल्या शिवलिंगाचे फोटो....