Home | Jeevan Mantra | Dharm | When Men Get Married Or Should Avoid? Know Important Facts Of 1 Hindu Scripture

PHOTOS : कोणत्याही पुरुषाने लग्न करण्यापूर्वी या गोष्टींचा अवश्य विचार करावा

धर्म डेस्क उज्जैन | Update - Nov 29, 2013, 01:27 PM IST

स्त्री पुरुषाची अर्धांगिनी असते. धर्मग्रंथातील या वाक्यावरून असे स्पष्ट होते की, जर स्त्री आणि पुरुषामध्ये योग्य ताळमेळ असेल तर सुखी जीवन जगता येते.

 • When Men Get Married Or Should Avoid? Know Important Facts Of 1 Hindu Scripture

  स्त्री पुरुषाची अर्धांगिनी असते. धर्मग्रंथातील या वाक्यावरून असे स्पष्ट होते की, जर स्त्री आणि पुरुषामध्ये योग्य ताळमेळ असेल तर सुखी जीवन जगता येते. विशेषतः गृहस्थ जीवनामध्ये पुरुषांच्या सर्व कामांमध्ये स्त्रीची भूमिका महत्वाची असते. धर्म-कर्मसुद्धा स्त्रीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. यामुळे प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा आदर करणे आवश्यक आहे.

  सध्याच्या धावपळीच्या जगात स्त्री-पुरुष पुढे जाण्याच्या महत्वकांक्षेने किंवा भौतिक सुख-सुविधांच्या झगमगाटात तत्काळ नवीन नातं निर्माण करतात, परंतु लग्नानंतर काही काळातच एकमेकांच्या गरजांवरून मतभेद निर्माण होताना दिसून येतात. प्राचीन धर्म ग्रंथांनुसार स्त्री-पुरुष संबंधाची अशी दुर्दशा होऊ नये म्हणून कोणत्याही पुरुषाने लग्न करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे.

  हिंदू धर्मग्रंथ भविष्यपुराणामध्ये पुरुषाने कोणत्या गोष्टींचा विचार करून लग्न करावे किंवा टाळावे यासंबंधी सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर, लग्न झाल्यानंतर पुरुषाने स्त्रीसोबत कसे राहावे या गोष्टींचीही माहिती देण्यात आली आहे.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, लग्नापूर्वी आणि नंतर पुरुषाने कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

 • When Men Get Married Or Should Avoid? Know Important Facts Of 1 Hindu Scripture

  या धर्मग्रंथानुसार स्वतः ब्रह्मदेवाने सांगितले आहे की, गृहस्थ जीवनात प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या पुरुषाने सर्वप्रथम यथाविधी विद्याध्ययन करून चांगल्या कर्माने धन कमवावे. त्यानंतर सुयोग्य, सदाचारी सुंदर मुलीशी शास्त्रोक्त पद्धतीने लग्न करावे. कारण पैशाशिवाय गृहस्थ जीवनाची दुर्गती निश्चित आहे.

 • When Men Get Married Or Should Avoid? Know Important Facts Of 1 Hindu Scripture

  पैसा कमावल्यानंतरही गृहस्थीमध्ये प्रवेशाचे महत्व सांगताना हेही लिहिण्यात आले आहे की, कोणत्याही पुरुषासाठी नरकातील घोर यातना सहन करणे शक्य आहे, परंतु धनाच्या अभावामध्ये घरामध्ये भुकेने व्याकूळ झालेल्या स्त्री किंवा मुलाला पाहणे शक्य नाही.

 • When Men Get Married Or Should Avoid? Know Important Facts Of 1 Hindu Scripture

  जवळ पैसा नसताना लग्न केल्यानंतर फटके-मळके कपडे घातलेले, दीन-दुःखी आणि उपाशी पत्नी आणि मुलांना पाहून ज्या पुरुषाचे हृदय कळवळून येणार नाही त्याच्या जगण्याला धिक्कार आहे. यामुळे चांगली, भक्कम उपजीविका नसलेले लग्न निरर्थक आहे.

 • When Men Get Married Or Should Avoid? Know Important Facts Of 1 Hindu Scripture

  ज्याप्रमाणे स्त्रीशिवाय गृहस्थ जीवन शक्य नाही, त्याचप्रमाणे धनहीन पुरुषांना गृहस्थ प्रवेश करण्याचा हक्क नाही. कारण धनहीन पुरुषासाठी त्रिवर्ग म्हणजे तीन पुरुषार्थ धर्म, अर्थ, आणि काम यांचा मेळ साधने शक्य नाही. असा पुरुष लग्न करून स्त्रीकडून सुख प्राप्त न करता यातना भोगतो.

 • When Men Get Married Or Should Avoid? Know Important Facts Of 1 Hindu Scripture

  अनेक लोक लग्नासंबंधी असा तर्क लावतात की, लग्न केल्याने आपत्य प्राप्ती करून धर्म, अर्थ व काम हे तीनही पुरुषार्थ पूर्ण होतात. परंतु धन आणि स्त्री याच दोन गोष्टी त्रिवर्ग (धर्म, कर्म व काम) साध्य करण्याचे माध्यम आहेत. धर्माचेसुद्धा दोन प्रकार सांगण्यात आले आहेत - इष्ट धर्म आणि पूर्त धर्म.

  इष्ट धर्मामध्ये यज्ञ, हवन इ. करणे आणि पूर्त धर्मामध्ये विहीर, आड, तलाव इ. निर्माण करणे समाविष्ट आहे. जे लग्नापूर्वी किंवा नंतर पैशानेच पूर्ण केले जाऊ शकतात.

 • When Men Get Married Or Should Avoid? Know Important Facts Of 1 Hindu Scripture

  लग्नापूर्वी पैशाला यामुळे महत्व आहे कारण की, लग्नानंतर पैसा नसेल तर भाऊ-बहिण, नातेवाईक अशा जोडप्याचा तिरस्कार करतात. परंतु तुमच्याजवळ पैसा असेल तर कुटुंबातील तसेच बाहेरील लोकही तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात.

 • When Men Get Married Or Should Avoid? Know Important Facts Of 1 Hindu Scripture

  पैसा हेच धर्म, अर्थ व काम पुरुषार्थाचे मूळ आहे. कारण धनवानाशी विद्या, कुळ आणि इतर श्रेष्ठ गोष्टी जुळल्या जातात तर दुसरीकडे गरीब हे सर्व गुण असूनही परिस्थितीमुळे नष्ट होतो. शास्त्र, शिल्प, कला आणि इतर सर्व कामामध्ये पैसा महत्वाचे माध्यम आहे. यामुळे पैशाशिवाय पुरुषाचा जन्म आणि विवाह निरर्थक आहे.

 • When Men Get Married Or Should Avoid? Know Important Facts Of 1 Hindu Scripture

  या पुराणानुसार मागील जन्मात केलेल्या पुण्यामुळे या जन्मात भरपूर धन मिळते आणि धनामुळे पुण्य. अशाप्रकारे धन आणि पुण्याचा घनिष्ठ संबंध आहे. पुण्यामुळे धन मिळते आणि धनामुळे पुण्य मिळवले जाऊ शकते. प्रत्येक पुरुषाने अशाप्रकारे धर्म, अर्थ आणि काम या गोष्टींच्या ताळमेळ साधावा. स्त्रीशिवाय आणि गरीब पुरुष हे लक्ष्य साध्य करू शकत नाहीत. यामुळे एखाद्या स्त्रीशी लग्न करण्यापूर्वी पैसा कमवणे फार आवश्यक आहे.

Trending