आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का साजरी केली जाते भाऊबीज, जाणुन घ्या रंजक गोष्टी आणि शुभ मुहूर्त...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच यमद्वितीयेलाच भाऊबीज म्हटले जाते. या दिवशी भाऊ बहिणीकडे हक्काने जातो. प्रेमाने जातो, औक्षण केल्यावर तिला प्रेमाने भेटवस्तू देतो. मान्यता आहे की, या दिवशी बहिणीच्या घरी भोजन केल्याने भावाचे आयुष्य वाढते. या दिवसाचे महत्त्व खालील प्रमाणे आहे.

धर्म ग्रंथांप्रमाणे, कार्तिक शुक्ल व्दितीयाच्या दिवशी यमुनाने आपला भाऊ यमला आपल्या घरी बोलवुन सत्कार करुन जेवू घातले. यामुळे या सणाला यम व्दितीया या नावाने देखील ओळखले जाते. तेव्हा यमराजने प्रसन्न होऊन यमुनेला वर दिला कि जो मनुष्य या दिवशी यमुनेत स्नान करुन यमाचे पूजन करेल, त्याला मृत्यूनंतर यमलोकात जावे लागणार नाही. सूर्याची पुत्री यमुना सर्व कष्टांचे निवारण करणारी देवी स्वरुप आहे.

त्यांचे भाऊ मृत्युचे देवता यमराज आहे. यम व्दितीयाच्या दिवशी यमुना नदीत स्नान करुन आणि तेथेच यमुना आणि यमराजची पूजा करण्याचे मोठे माहात्म मानले आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला टिळक लावून त्याच्या दिर्घायुष्यासाठी यमराजकडे प्रार्थना करते. स्किंद पुराणात लिहिले आहे की, या दिवशी यमराजला प्रसन्न करणा-यांना मनाप्रमाणे फळ मिळते. धन-धान्य, यश आणि दिर्घायु प्राप्त होते.
शुभ मुहूर्त
सकाळी 09:30 ते 10:55 वाजेपर्यंत
सकाळी 10:55 ते दुपारी 12:25 वाजेपर्यंत
दुपारी 12:25 ते 01:45 वाजेपर्यंत
दुपारी 2:50 ते 04:20 वाजेपर्यंत
संध्याकाळी 07:15 ते 08:33 वाजेपर्यंत
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या भाऊबीजेला काय करावे
बातम्या आणखी आहेत...