आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या का द्यावे दान, किती प्रकारचे असते दान?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये काही कामे प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य सांगण्यात आली आहेत. त्यामधील एक महत्त्वाचे काम म्हणजे आपल्या सामर्थ्यानुसार दान करणे. धर्म ग्रंथानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या कमाईतील काही भाग गरजू लोकांना दान करण्यासाठी वापरावा.
दानाचा अर्थ आहे देणे. जी वस्तू स्वतःच्या इच्छेने इतरांना देऊन परत न घेणे याला दान म्हणतात. दानामध्ये अन्न, पाणी, धन-धान्य, गाय, बैल इ. गोष्टी दिल्या जातात. परंपरेमध्ये दानाला कर्तव्य आणि धर्म मानले जाते. या संदर्भात शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की...

दानं दमो दया क्षान्ति: सर्वेषां धर्मसाधनम् ॥ (याज्ञवल्क्यस्मृति, गृहस्थ)
अर्थ : अन्नजलादी वस्तूंचे दान, मनाला निषिद्ध विषयांचे चिंतन करू न देणे, दीनदुबळ्यांवर दया करणे आणि एखाद्याने अपकार केला असताही चित्ताचा क्षोभ होऊ न देणे, ही धर्माची साधने आहेत.
बातम्या आणखी आहेत...