आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का आहे ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर, कसे पडले या ठिकाणाचे नाव पुष्कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुष्कर शहर पौराणिक आणि धार्मिक दृष्टीने खूप खास मानले जाते. पुष्करचा उल्लेख अनेक पुराण आणि ग्रंथांमध्ये आढळून येतो. असे मानले जाते की, चारधाम यात्रा करून जो व्यक्ती पुष्करमध्ये स्नान करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात.

पुष्करचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतातील एकमेव ब्रह्मदेवाचे मंदिर. सृष्टीचे निर्माता, पालनकर्ता आणि संहारक भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना मानले जाते. भगवान विष्णू आणि महादेवाची अनेक मंदिरे जगभरात आहेत, परंतु ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर असणे अनेकांसाठी रहस्याचा विषय आहे. ब्रह्मदेवाचे संपूर्ण विश्वात एकच मंदिर असण्यामागे एक पौराणिक कथा आहे.

यामुळे संपूर्ण जगात केवळ पुष्कर येथे आहे ब्रह्मदेवाचे मंदिर
पुराणांनुसार, एकदा ब्रह्मदेव हातामध्ये कमळाचे फुल घेऊन आपले वाहन हंसावर बसून अग्नी यज्ञ करण्यासाठी योग्य ठिकाणाचा शोध घेत होते. तेवढ्यात त्यांच्या हातामधील कमळाचे फुल एका ठिकाणी पडले. फुल पृथ्वीवर पडताच तेथे तीन तलाव तयार झाले. त्या तीन तलावांना ब्रह्म पुष्कर, शिव पुष्कर आणि विष्णू पुष्कर असे मानले जाते. याच ठिकाणी ब्रह्मदेवाने अग्नी यज्ञ करण्याचे ठरवले.
यज्ञामध्ये ब्रह्मदेवासोबत त्यांची पत्नी असणे आवश्यक होते. भगवान ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री तेथे उपस्थित नव्हत्या आणि शुभमुहूर्ताची वेळ निघून चालली होती. यामुळे ब्रह्मदेवाने त्याचक्षणी तेथे उपस्थित असलेल्या एका सुंदर स्त्रीसोबत लग्न करून यज्ञ संपन्न केला. ही गोष्ट देवी सरस्वती यांना समजल्यानंतर क्रोधीत होऊन त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की, ज्यांनी या सृष्टीची रचना केली त्यांची पूर्ण सृष्टीवर कोठेच पूजा केली जाणार नाही. पुष्करसोडून इतर कोणत्याही ठिकाणी ब्रह्मदेवाचे मंदिर नसेल. याच शापामुळे ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर पुष्कर येथे आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पुष्करशी संबधित काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...