आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या रात्री का खेळतात जुगार, या आहेत काही गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक सणासोबत काही परंपरा जोडलेल्या असतात. या परंपरांचे काही सकारात्मक बाजु असतात तर काही नकारात्मक असतात. दिवाळीच्या रात्री जुगार खेळणे देखील या सणाचा नकारात्मक पैलु आहे. कथा आहे की, दिवाळीच्या दिवशी देव महादेव पार्वतीने देखील जुगार खेळला होता. तेव्हापासुन ही प्रथा सुरु झाली. खरे तर महादेव पार्वतीने जुगार खेळल्याचे काही ठोस तथ्य ग्रंथामध्ये नाही.
जुगार या खेळामुळे फक्त मनुष्यच नाही तर देवतांना देखील संकटात आले आहेत. आज आपण जुगारा संबंधीत काही खास गोष्टी सांगत आहोत...
राजा नलने सर्व काही हरले होते
महाभारतात राजा नल आणि दमयंतीची कथा आहे. दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम होते. नल चक्रवर्ती सम्राट होते. एकदा ते आपल्या नातेवाइकांसोबत चौरस खेळण्यास बसले. सोन्याच्या मोहरांवर सगळे बोली लावु लागले. राजा नलचे नातेवाइक कपटी होते. त्यांनी राजाचा सर्व खजाना, राजपाट, महाल, सेना सर्व काही जिंकूण घेतले. राजाची परिस्थिती खुप खराब झाली त्यांच्याकडे कपडेदेखील उरले नाही. जुगारामुळे राजाचे हे हाल झाले. नंतर राजा नलला आपले साम्राज्य मिळवण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला.
पत्नी देखील हारले होते पांडव
महाभारताच्या कथेचे केंद्र जुगार हा खेळच आहे. दुर्योधनाने शकुनिसोबत मिळुन पांडवांचा विश्वास घात केला आणि जुगारामध्ये संपुर्ण इंद्रप्रस्थ जिंकला. युधिष्ठिर बोली लावत गेले आणि आणि सतत पराभूत होत राहिले. शेवटी स्वतःला, चारी भावांना आणि पत्नी द्रोपतीला देखील पराभूत झाले. द्रौपतीचे चीरहरण झाले. यानंतर पांडवांना 13 वर्षांसाठी वनवासात जावे लागले. एका जुगाराच्या खेळामुळे त्यांचे सर्व आयुष्य बदलले.
पुढील स्लाईडवर वाचा... जुगाराची बदल गेलेली पध्दती....
बातम्या आणखी आहेत...