आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का करावा स्त्रियांचा सन्मान, एका ब्रह्मचारी व्यक्तीने सांगितले होते हे रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये महिलांकडे खूप आदर आणि सन्मानाने पाहिले जाते. हिंदू धर्म ग्रंथांमध्ये अनेक महान, पतिव्रता, आणि दृढ इच्छाशक्ती असणार्या महिलांचे वर्णन मिळते. महिलांच्या बाबतीत विविध धर्म ग्रंथांमध्ये सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. काही ग्रंथामध्ये महिलांच्या कर्तव्यांचे वर्णन करण्यात आले आहे तर काहीमध्ये त्यांच्या व्यवहार, वागणूक, आचरणाशी संबधित सांगण्यात आले आहे.

अशा प्रकारे महाभारतामध्ये महिलांच्या संदर्भात काही विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये बाणांच्या शय्येवर असलेल्या भीष्म पितामह यांनी युधिष्ठिरला सांगितल्या होत्या. यामधील काही गोष्टी खूप रोचक आणि आजच्या काळामध्ये प्रासंगिक आहेत. आज (८ मार्च, शनिवार) महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला या खास गोष्टी सांगत आहोत.

महिलांचा अनादर करू नये -
भीष्म पितामह यांनी युधिष्ठिरला सांगितले, की ज्या घरामध्ये महिलांचा अनादर होतो, तेथील सर्व कार्य अपूर्ण राहतात. ज्या कुळातील सुनांना, मुलींना दुःख मिळाल्यामुळे शोक होतो, त्या कुळाचा नाश निश्चित आहे.

लक्ष्मीचे रूप आहे स्त्री -
भीष्म पितामह यांच्यानुसार स्त्रिया घरातील लक्ष्मी आहेत. पुरुषांनी त्यांचा योग्य मान-सन्मान, आदर ठेवावा. घरातील स्त्रीला नेहमी प्रसन्न ठेवावे. त्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.

पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, स्त्रियांना प्रसन्न का ठेवावे...