आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Can Not Hide The Secret Tales, Because It\'s A Curse.

महिलांच्या पोटात लपून राहात नाही कोणतीही गोष्ट, हा शाप आहे यामागचे कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांच्या पोटात कोणतीही गोष्ट दीर्घकाळ लपूत राहात नाही, असे म्हटले जाते. याचा अनेकांनी अनुभव देखील घेतला असेल. महिला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गोपनीय गोष्‍ट उघड करून टाकतात. कदाचित आपल्याला माहीत नसेल, यामागे एक रहस्य आहे. ते आज आम्ही आपल्यासमोर उलगडणार आहोत. महर्षी वेदव्यास लिखित 'महाभारत'मध्ये या संदर्भात उल्लेख आढळतो.

महाभारतानुसार, महाराज युधिष्ठिर यांनी संपूर्ण स्त्री जातीला एक शाप दिला होता. संसारातील समस्त स्त्रिया आपल्या पोटात कोणतीही गोपनिय गोष्ट दीर्घकाळ लपवून ठेवू शकणार नाही.

राज युधिष्ठिर यांनी का दिला स्त्री जातीला हा शाप?
महाभारतातील शांती पर्वानुसार, युद्ध समाप्त झाल्यानंतर राजा युधिष्ठिर राजमहालात परतले. तेव्हा माता कुंतीने एक गोप्यस्फोट केला. कर्ण हे युधिष्ठिर यांचे थोरले बंधू होते, असे माता कुंतीने पांडवांना सांगितले. कुंतीच्या या गोप्यस्फोटामुळे पांडव हादरले. परंतु, राजा युधिष्ठिर यांनी संताप आवरुन थोरले कर्ण यांच्या पार्थिवावर विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले.

माता कुंतीने नंतर पांडवांना कर्णाच्या जन्माचे रहस्य सांगितले. ते ऐकून युधिष्ठिर यांना प्रचंड संताप आला. संतापाच्या भरात त्यांनी संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला की, पृथ्वीवरील कोणतीही महिला असो, ती एखादी गोपनीय गोष्ट दीर्घकाळ लपवून ठेवू शकणार नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ऋषि किंदम यांनी दिला होता राजा पांडुला हा शाप