आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुनाची तहान भागवण्यासाठी कृष्णाने सोडला बाण, किल्ल्यात तयार झाली विहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूनेस्कोच्या जगप्रसिद्ध वास्तूंमध्ये समाविष्ट असलेला जैसलमेरचा किल्ला विविध गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. या किल्ल्यात 99 बुरुज असून यावर शत्रूंचा नाश करण्यासाठी तोफा ठेवण्यात आल्या आहेत. हा किल्ला पिवळ्या रंगाचे दगड एकावरएक रचून चुन्याचा वापर न करता आश्चर्यकारक पद्धतीने बांधण्यात आला आहे. ही या किल्ल्याची एक खास विशेषता आहे. 858 वर्षांपासून वाळवंटात उभा असलेला हा किल्ला 12000 पेक्षा जात कुटुंबाचे घर आहे.

या किल्ल्याशी संबधित महाभारत काळातील एक कथा आहे. असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन येथे 80 मीटर उंच असलेल्या त्रिकुट पर्वतावर आले होते. त्यावेळी अर्जुनाला खूप तहान लागली होती आणि सभोवतीली कुठेही पाणी नव्हते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने बाण सोडून येथे एक विहीर खोदली. या विहिरीतल पाण्याने अर्जुनाची तहान भागली. हे ठिकाण आज कृष्ण कुंड नावाने प्रसिद्ध आहे.

पुढील स्लाईड्सवर वाचा या किल्ल्याची संपूर्ण कथा....