Home | Jeevan Mantra | Dharm | Worship Goddess Laxmi To Be Prosperous

PICS : दररोज या 5 छोट्या-छोट्या अचूक उपायांनी प्राप्त होईल महालक्ष्मीची कृपा

धर्म डेस्क | Update - Dec 13, 2013, 02:28 PM IST

कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण ही संघर्षाची वेळ असते. कुटुंबामध्ये रोग, बाधा, घटना, व्यवसायामध्ये तोटा अशा स्वरुपात आलेल्या कोणत्याही संकटामुळे मनुष्याला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते.

 • Worship Goddess Laxmi To Be Prosperous

  कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण ही संघर्षाची वेळ असते. कुटुंबामध्ये रोग, बाधा, घटना, व्यवसायामध्ये तोटा अशा स्वरुपात आलेल्या कोणत्याही संकटामुळे मनुष्याला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. तुम्हीही अशाच काही गोष्टींमुळे आर्थिक अडचणीत अडकले असाल तर धार्मिक परंपरेमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही सोपे आणि अचूक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यानंतर लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न राहील.

  उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • Worship Goddess Laxmi To Be Prosperous

  सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वात पहिले स्वतःच्या हातांचे दर्शन घ्यावे. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की,  'कराग्रे वसते लक्ष्मी'  म्हणजे हाताच्या आग्र (पुढील) भागात लक्ष्मीचा निवास मानला गेला आहे.

 • Worship Goddess Laxmi To Be Prosperous

  शास्त्रामध्ये देवी तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. तुळशीला देवपूजेचे किंवा पवित्र जल अर्पण करावे. तुळशीला अपवित्र पाणी अर्पण करू नये तसेच सांयकाळी आणि रात्री तुळशीचे पानं तोडू नयेत.

 • Worship Goddess Laxmi To Be Prosperous

  एखाद्या तीर्थक्षेत्रावर किंवा पवित्र नदीवर जाउन सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. पवित्रतेमध्ये लक्ष्मीचा वास मानला गेला आहे. यामुळे असे मानले जाते की, तीर्थक्षेत्रावर गेल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

 • Worship Goddess Laxmi To Be Prosperous

  सायंकाळी घराच्या मुख्य प्रवेश दाराजवळ आणि तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. सायंकाळची वेळ लक्ष्मी भ्रमणाची असते असे मानले जाते. तुळस आणि गाईला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.

 • Worship Goddess Laxmi To Be Prosperous

  सकाळी आणि संध्याकाळी आंगणामध्ये सडा(पाणी शिंपडावे) टाकावा. अशोकाच्या झाडाला जल अर्पण करावे. या सोप्या आणि अचूक उपायांमुळे तुमचा भाग्योदय होईल.

Trending