आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Worship Lord Shiv By Offering Sugarcane Juice For Happiness

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमावस्या : महादेवाच्या या उपायाने प्राप्त होईल सुख-समृद्धी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - कुठल्याही कारणामुळे होणारा संताप अथवा राग व्यक्तीला तमाम सुख-सुविधा असताना देखील सुखाने राहु देत नाही. ज्याप्रकारे शरीरातील गर्मीमुळे शरीर तापले जाते त्याचप्रकारे संताप देखील माणसाला आतल्या आत जाळत असतो.
जीवनात येणा-या अशाच दु:ख आणि संतापापासुन दूर राहण्यासाठी धर्मशास्त्रात सुखात असताना अथवा दु:खात असताना ईश्वराला स्मरण करण्यास सांगण्यात आले आहे, कारण देवाची उपासना केल्याने मनात आत्मविश्वास आणि एक नवि आशा निर्माण होण्यास मदत होत असते. याच एका कारणामुळे दु:खापासुन सुटका मिळवण्यासाठी देवाच्या विशेष उपासनेचे महत्व शास्त्रात सांगण्यात आले आहे.
हिंदू धर्मामध्ये दु:ख आणि संताप दूर करण्यासाठी देवाच्या रुपात भगवान रूद्र म्हणजेच शिव पूजनीय मानले गेले आहेत. जलधारेच्या अभिषेकाने प्रसन्न होणारे देवता शिवाचे विशेष फळाच्या रसाने केलेला अभिषेक शुभ मानला गेला आहे.
तुम्हीदेखील मानसिक, शारीरिक अथवा आर्थिक त्रासाचा सामना करत असाल तर खास आषाढ़ माहिन्यात येणा-या शिव चतुर्दशी (25,26 जून) आणि आज आमावस्या (27 जून) या दिवशी जीवनात येणा-या संतापापसुन सुटका मिळवण्यासाठी शिवशंकरचा येथे सांगितल्याप्रमाणे विशेष रसाने व मंत्राने अभिषेक केल्याने फायदेशीर ठरू शकते..
या तिथिशिवाय ग्रीष्म ऋतु दरम्यान शिवशंकराला ऊसाच्या रसाने केलेल्या अभिषेकामुळे मानसिक शांतिसोबतच घर-परिवारातील सर्व कलहाचा अंत करणारे मानण्यात आले आहे.
पुढील फोटोतुन जाणुन घेऊ या साधा आणि सरळ उपाय करण्याचा विधी -
(फोटो- शिवलिंग अभिषेकाचा डेमो पिक)