आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांच्यावर प्रसन्न होतात हनुमान, त्यांना प्राप्त होऊ लागतात या 6 गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भौतिक सुखांनी भरलेल्या आजच्या या युगात अनेक लोक मनातील आणि बाहेरील द्वंद्व किंवा संघर्षामुळे दुःखी होऊन सुखापासून वंचित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा मानसिक आणि व्यावहारिक स्थितीमध्ये एक श्रेष्ठ गुरु मिळणे कठीण काम होऊन बसते. तुम्हालाही संकटमोचक गुरु प्राप्तीची इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेल्या सहा सूत्रांमधून तुम्हाला एका श्रेष्ठ गुरुसोबत यशाचे सहा अचूक गुरुमंत्रही शिकण्यास मिळतील.

अनमोल सूत्र - संकटमोचक हनुमानाची गुरुसमान सेवा, भक्ती करणे हे आहे. शनिवार आणि मंगळवार हनुमान उपासनेचे शुभ दिवस मानले जातात. श्री हनुमंताला गुरु मानून त्यांच्या चरित्राचे स्मरण यशस्वी जीवनाचे केवळ मार्गदर्शनच ठरत नाही तर संकटमोचकही सिद्ध होते.

गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमान भक्तीसाठी रचलेल्या श्रीहनुमान चालीसाची सुरुवात गुरु स्मरणाने होते. यामध्ये श्रीहनुमानाप्रित्यर्थ गुरु भक्तीचा भाव दिसून येतो. अशाच गुरु भावनेने हनुमानाचे स्मरण करून पुढील सहा सूत्रांचा अवलंब केल्यास जीवनात तुम्ही उंच शिखरावर पोहचू शकता.

विनम्रता - गुण आणि शक्ती संपन्न असूनही हनुमान अहंकारापासून मुक्त होते. यावरून अशी शिकवण मिळते की, कोणत्याही रुपात अहंपणाला थारा देऊ नये. हनुमानाची भक्ती नेहमी नम्रता आणि शिकण्याची भावना मनामध्ये कायम ठेवते. यामुळे यशाचा मार्ग सुकर होतो.

मान आणि समर्पण - श्रीहनुमानाने प्रत्येक नात्याला मान दिला आणि त्याला समर्पित राहिले. मग ती आई असो किंवा वानर राज सुग्रीव किंवा स्वतःचे सर्वस्व भगवान श्रीराम. हनुमान भक्ती प्रेरणा देते की, कुटुंब आणि आपल्या क्षेत्राशी निगडीत प्रत्येक संबंधामध्ये मधुरता कायम ठेवावी. कारण या नात्यांच्या प्रेम, विश्वास आणि सहयोगाने मिळालेली उर्जा, उत्साह तुमच्या यशाचा मार्ग निश्चित करते.

इतर चार सूत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)