Home | Jeevan Mantra | Dharm | Worship Tulsi Make Prosperous And Rich

PICS : सकाळी तुळशीच्या या छोट्या उपायाने प्रसन्न होते महालक्ष्मी

दिव्य मराठी | Update - Dec 09, 2013, 11:59 AM IST

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला पवित्र मानले जाते. धर्म ग्रंथांमध्ये भगवान विष्णू आणि वृंदा म्हणजे तुळस यांच्या विवाहाचा उल्लेख आढळून येतो.

 • Worship Tulsi Make Prosperous And Rich

  हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला पवित्र मानले जाते. धर्म ग्रंथांमध्ये भगवान विष्णू आणि वृंदा म्हणजे तुळस यांच्या विवाहाचा उल्लेख आढळून येतो. यामुळे तुळशीला विष्णुप्रिया म्हटले जाते. याच कारणामुळे घराच्या आंगणात लावलेले तुळशीचे रोप घरातील कलह आणि दारिद्र्य दूर करणारे मानले जाते.

  धार्मिक दृष्टीकोनातून घरामध्ये तुळस असल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि सुखाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुळशीचा शुभ प्रभाव आणि लक्ष्मी कृपा प्राप्त करण्याचा एक उपाय...

 • Worship Tulsi Make Prosperous And Rich

  वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तुळशीला औषधी गुण असलेले रोप मानले गेले आहे. घरामध्ये लावलेल्या या रोपाचा गंध रोगाणुनाशक आहे. तुळशीच्या रसाने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्याचबरोबर तुळशीच्या रोपामध्ये असलेली विद्युत उर्जा विविधप्रकारच्या दुष्प्रभावांपासून आपली रक्षा करते.

  तुम्हालाही घरातील दुःख, कलह आणि दारिद्र्य दूर करण्याची इच्छा असेल तर पुढील स्लाईडमध्ये सांगण्यात आलेला खास मंत्र उपाय अवश्य करून पाहा...

 • Worship Tulsi Make Prosperous And Rich

  केवळ स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीसुद्धा स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून तुळशीची पूजा करावी. जल अर्पण करून खालील मंत्राचा जप अवश्य करा.

  महाप्रसाद जननी सर्वसौभाग्यवर्द्धिनी।
  आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।।

  तुळशीच्या या पूजा आणि मंत्र उपायाने घरातील दुःख, कलह, दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल.

Trending