आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवध्यान साधनेचा महामूल मंत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाशिवरात्रीला माघ महिन्याच्या उत्तररात्रीपासून ते फाल्गुन महिन्याच्या प्रात:कालापर्यंत ओम नम: शिवाय शिवध्यान नामस्मरण साधनेला अन्यन्य साधारण महत्त्व आहे. पुरातन कालापासून अनेक थोर विभूतींनी याची महिमा परंपरेने सांगितलेली आहे. 
 
अगदी अलिकडच्या काळातील उदाहरणे द्यायची झाल्यास जे. कृष्णूमूर्ती, ओशो आणि श्री श्री रविशंकर यांनीही मानवी मनातील पर्यायाने शरीरातील आंतरिक ऊर्जा ही उच्चस्तरापर्यंत प्राप्त करण्यासाठी ओम नम: शिवाय या पंचाक्षरी महा मूलमंत्राचा आजघडीला जगभरातील कोट्यवधी साधकांकडून वापर केला जातो.
 
 हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. या मंत्राच्या चिरंतन धान स्मरणाशिवाय शरीरातील प्रेरक ऊर्जा दीर्घकाळ टिकून राहत नाही. हे मानसशास्त्रीय आणि मानव्य शरीरवैद्यक शास्त्रातील मेंदूविकार तज्ज्ञांनीसुद्धा आता मान्य केले आहे. विविध क्षेत्रातील ९० टक्के यशस्वी दिग्गज ओम नम: शिवाय या शिवसाधनेतील मंत्राचा उपयोग करतात. 
 
योग साधना पूर्णत्वाने साध्य करण्याचे साधन आहे. शरीर शुद्धिकरणासाठी निरोगी आयुष्याचे पूरक महामंत्र म्हणून ओम नम: शिवाय या महा मूल पंचाक्षरी मंत्रावर विविध शास्त्रीय संशोधन जगभरात करण्यात आले आहेत. काही जण सुदृढ शरीराचे प्रतीक म्हणजे शिवलिंग मानतात, कारण ते महाऊर्जा संकलनाचे केंद्र मानले जाते. त्यासाठी त्याची आराधना महत्त्वाची आहे. 
 
 
ध्यानसाधेनेत या मूल महामंत्राची शास्त्रीय सांगड घालून मन, शरीर, मेंदू आणि संगित या बाबींचा वापर करणाऱ्या साधकांचे आरोग्य कसे निरोगी आढळले आहे, हे ताडून पाहण्यात आले आहे. म्हणूनच ओम नम: शिवाय या पंचाक्षरी महामूलमंत्राला जगन्मान्यता मिळाली आहे.
 ध्यान योगसाधनेत या महामंत्रामुळे शरीरातील सकारत्मक शक्ती आणि उर्जावृध्दी होते, हे विज्ञानाने मान्य केले आहे. यावरील संशोधन पुरातन काळापासून होत आले आहे. शिवसाधनेत पंच महाभूतांच्या आराधनेसाठी ओम नम: शिवाय मूलमंत्राचा वापर देवकालापासून होत आल्याची असंख्य उदाहरणे आखिल हिंदू धर्म संस्कृतीला उजाळा देणाऱ्या बहुतांश ग्रंथांमध्ये आढळतात. 
 
प्रसन्नतेसाठी या मंत्राला पुरातन काळापासून महत्व देण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणाजे ध्यान योग साधनेचे महत्त्व ज्या-ज्या धर्मांमध्ये शास्त्रीय पध्दतीने सांगण्याचा प्रयत्न झाला, त्या-त्या सर्व धर्माच्या ध्यानसाधनेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ओम नम: शिवाय या महा मूलमंत्राचा वापर विविध काळात झाल्याचे आपल्या लक्षात येते.
 
 कोणत्याही ध्यान योग साधनेत ओम नम: शिवाय या महामंत्राचे निरंतर स्मरण मोलाचे मानण्यात आले आहे. पृथ्वी, जल आकाश, अग्नी आणि वायू या पंच महाभूतांचा संबंध मानवी शरीरातील महत्त्वाच्या संवेदनशील पंचेद्रियाशी (त्वचा, डोळे, कान, नाक आणि तोंड) आध्यात्मिक अंगाने सांधण्याचे यशस्वी सूत्र म्हणजे ओम नम: शिवाय हा महा पंचाक्षरी मूलमंत्र होय. 
 
अग्नी आकाशाकडे खेचली जाते. जल त्याविरूध्द पृथ्वीकडे गुरूत्वाकर्षित होतो. त्या अनुषंगाने ध्यानसाधनेद्वारे आपल्या मनाला संतुलित ठेवता येते.  या मंत्रापासूनच महामृत्युंजय मंत्राची निर्मिती झाली. तात्पर्य दुर्गुणांची समिधा यज्ञकुंडात स्वाहा करा. नव्या विचाराने भूतकाळ आणि भविष्यकाल विसरून वर्तमानात जगायला शिका. त्यासाठी शिवध्यान योगसाधना पूरक आहे.

अोशाेंच्या भाषेत शिवसूत्राचे माहात्म्य
शिव म्हणजे कोणी पुरोहित नाही. शिव म्हणजे क्रांतीदृष्टा आहे. शिव संकल्पनेत तो (म्हणजे शिव) जे सांगेल ते आग आहे. आपण जर त्या शिवाला आगीसह स्वीकार करण्यासाठी सिध्द असाल तरच त्याच्या जवळ जा. आपण शिवध्यान साधनेची अनुभूती घेण्यासाठी तयार असाल तर तुम्ही आंतरिकदृष्ट्या मिटण्यासाठी अर्थात शून्यात जाण्यासाठी तयार रहा.
 
तुम्ही जेव्हा मिटाल, तेव्हाच तुमच्यातील नव्या बीजाचे अंकुरण होईल. नवजीवन प्राप्त होईल. कारण तुमच्या जळण्यातून (मन:पूर्वक शिवध्यान साधनेतून) निघालेल्या राखेतच नव्या बीजाचे कोंब फूटू शकतील. नव जीवनाची चैतन्यमयी सुरूवात होऊ शकेल. म्हणूनच आपण शिवध्यान साधनेचे निमंत्रण स्वीकारताना स्वत:च्या आहूतीची तयारी ठेवली पाहिजे!
 
आरोग्य संघटनेकडून योगसाधनेला महत्त्व 
जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलेल्या ‘उत्तम आरोग्या’च्या व्याख्येतही आता ‘अाध्यात्मिक सकारात्मक शक्ती’ ही संकल्पना समाविष्ट करण्यात आली आहे. त्यात भारतीय योग साधनेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. किंबहुना योगसाधनेत ध्यानधारणेला मुख्य साधन मानले जाते. कारण ध्यानसाधना योग प्रकार हा आरोग्यदायी आणि विविध आजारांचे वाहक असणाऱ्या सर्वांनाच करता येणे शक्य आहे. अगदी असाध्य आजारी रुग्णालाही आहे त्या स्थितीत शास्त्रीय माहितीच्या आधारे ओम नम: शिवाय नामस्मरण ध्यानसाधना करणे सहज साध्य आहे.

मंत्रजपाचे तीन प्रकार
ध्यानसाधनेच्या अनेक प्रकारांपैकी प्रचलित पुरातन असे तीन प्रकार आहेत.  सर्व प्रकारची सुदृढ शररीरसंपदा असलेल्या आणि नसलेल्या सर्वांना ओम नम: शिवाय या मंत्राच्या योग्य वापराने शरीरातील पंचेंद्रिये नियंत्रित करता येणे शक्य आहे. 

१. ‘ओम नम: शिवाय’ हा पंचाक्षरी मूलमंत्र ऐकणे. 
२. श्वसनाच्या कंपन तालीत मंत्राचे उच्चारण करणे. 
३. ओठांची हालचाल न करता मनातल्या मनात निरंतर स्मरण उच्चारण करीत राहणे
बातम्या आणखी आहेत...