आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • योगिनी एकादशी उद्या : वाचा, व्रताचे महत्त्व; पूजन विधी व कथा

योगिनी एकादशी आज : वाचा, व्रताचे महत्त्व; पूजन विधी व कथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या वर्षी हि एकादशी 12 जून, शुक्रवारी आहे. धर्म शास्त्रानुसार हे व्रत केल्याने भगवान शंकरासह भगवान विष्णूही प्रसन्न होतात. या एका व्रताचे पुण्य 88 हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याच्या पुण्याएवढे असते. पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कम्रेंद्रियांसह मनावर नियंत्रण ठेवण्यास हे व्रत सहायक ठरते. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे सर्व रोग नष्ट होतात.

व्रत विधी -
योगिनी एकदाची व्रत नियमाचे पालन दशमी तिथी (11 जून, गुरुवार)ला रात्रीपासून सुरु करावे. ब्रह्मचर्यचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी उपवास करावा. या व्रताच्या उपवासात खडीसाखर, द्रवपदार्थ, दूध आणि दुधापासून केलेली पक्वान्ने ग्रहण करतात. हे व्रत वर्षा ऋतूच्या आरंभी केले जाते. नवा भाजीपाला येण्याचा हाच काळ असतो. आरोग्यास अपायकारक अनेक जिवाणू उत्पन्न झालेले असतात. त्यामुळे एक दिवस निराहार राहून दीर्घकाळ निरोगी राहण्याचे सूत्र सांगणारे हे व्रत आहे.

एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णुंची विधिव्रत पूजा करावी. (तुम्हाला पूजा करणे शक्य नसेल तर एखाद्या ब्राह्मणाकडून पूजा करून घेऊ शकता) पवित्र होऊन भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर बसून संकल्प घ्या. संकल्प घेताना खालील मंत्राचा उच्चार करा...

मम सकल पापक्षयपूर्वक कुष्ठादिरोग निवृत्तिकामनया योगिन्येकादशीव्रतमहं करिष्ये।

त्यानंतर भगवान विष्णूला पंचामृताने अभिषेक करा. अभिषेक केल्यानंतर देवाचे चरणामृत(तीर्थ) व्रती (व्रत करणारा) आणि कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर शिंपडावे आणि तीर्थ प्राशन करावे. असे मानले जाते की, यामुळे विशेषतः कुष्ठ रोगाची पिडा नष्ट होते आणि तो रोगमुक्त होतो.
त्यानंतर देवाला गंध, पुष्प, धूप-दीप, नैवेद्य इ. पूजन सामग्री अर्पण करावी. विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा. या दिवशी तन आणि मनाने हिंसेचा त्याग करावा तसेच कोणाचीही निंदा करू नये. रात्री जागरण करावे.

योगिनी एकादशी व्रत कथा वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...