चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजनीती आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे.
येथे जाणून घ्या, चाणक्यांनी सांगितलेल्या खास 10 नीती...