आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • #InternationalYogaDay2018: जाणून घ्या भगवान पतंजलींबाबत, ज्यांनी जगासाठी सुलभ केला योग Know About Maharshi Patanjali Who Compiled Yoga Sutra

जाणून घ्या भगवान पतंजलींबाबत, ज्यांनी जगासाठी सुलभ केला योग #InternationalYogaDay2018

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - महर्षी पतंजली हे पुष्यमित्र शुंग (195-142 इ.पू.) च्या शासनकाळात होते, असे मानतात. आज योगाचे जे ज्ञान सुलभतेने उपलब्या आहे, तर त्याचे श्रेय महर्षी पतंजलींनाच जाते. त्यापूर्वी योगसूत्रे विखुरलेली होती. त्यांना समजणे सामान्यांचे आवाक्याबाहेर होते. ही समस्या जाणून महर्षी पतंजली यांनी योगाच्या 195 सूत्रांना एकत्रित करून अष्टांग योगाची निर्मिती केली. आज पूर्ण जगात विश्व योग दिन साजरा केला जात आहे. 

 

अशी आहे आख्यायिका
महर्षी पतंजली यांच्या जन्माबाबत एक धार्मिक कथा सांगितली जाते. सर्व ऋषी-मुनी भगवान विष्णूंकडे गेले व म्हणाले की, "प्रभो, आपण धन्वंतरीचा अवतार घेऊन शारीरिक रोगांच्या उपचारांसाठी आयुर्वेद दिले, परंतु अजूनही पृथ्वीवर लोक काम, क्रोध आणि मनातील वासनांनी पीडित आहेत, या सर्व विकारांपासून मुक्तीचा मार्ग काय आहे? बहुतांश लोक शारीरिकच नाही, तर मानसिक आणि भावनात्मक पातळीवरही विकारांनी दु:खी होतात."
भगवान आदिशेष शेषशय्येवर पहुडलेले होते. हजारो मुखी आदिशेषनाग, जागरूकतेचे प्रतीक आहे. त्यांनी ऋषी-मुनींची प्रार्थना ऐकून, जागरूकतेचे रूप असलेल्या आदिशेषाला महर्षी पतंजलींच्या रूपात पृथ्वीवर पाठवले. याप्रकारे योगाचे ज्ञान प्रदान करण्यासाठी पृथ्वीवर महर्षी पतंजली यांचा अवतार झाला.

 

योगाला धर्मापासून केले वेगळे
कालांतराने महर्षी पतंजलींनी सांगितलेली 195 योगसूत्रे योगाची दिपस्तंभ ठरली. पतंजली हेच आद्य आणि एकमेव असे व्यक्ती होते ज्यांनी योगाला आस्था, अंधश्रद्धा आणि धर्माच्या बाहेर काढून एक सुव्यवस्थित रूप दिले होते.
योग हिन्दू धर्माच्या 6 दर्शनांपैकी एक आहे. परंतु याचा धर्माशी काहीही संबंध नाही. योगाचे ध्यानाने संयोजन होते. बौद्ध धर्मातही ध्यानासाठी याला महत्त्व आहे. आणि ध्यानाचा संबंध इस्लाम तसेच ख्रिश्चन धर्मासोबतही आहे. हा ग्रंथ आतापर्यंत हजारो भाषांमध्ये लिहिण्यात आला आहे.

 

असा आहे अष्टांग योग
महर्षी पतंजलींनी अष्टांग योगाची महिमा सांगितली, आरोग्यदायी जीवनासाठी हे महत्वपूर्ण आहे. महर्षी पतंजलींनी द्वितीय आणि तृतीय पादमध्ये ज्या अष्टांग योगसाधनेचा उपदेश केला आहे, त्यांची नावे अशी आहेत- 1. यम, 2. नियम, 3. आसन, 4. प्राणायाम, 5. प्रत्याहार, 6. धारणा, 7. ध्यान आणि 8. समाधि. 
> या 8 अंगांची आपापली उप अंगेही आहेत. सध्याच्या काळात यापैकी योगाची 3 अंगेच प्रचलित आहेत. - आसन, प्राणायाम आणि ध्यान.

> आजच्या काळात बहुतांश लोक फक्त शारीरिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठीच योग करत आहेत, परंतु योगाच्या मदतीने तन आणि मन दोन्ही सुंदर केले जाऊ शकते.  

बातम्या आणखी आहेत...