Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | promise day news

प्रॉमिस डे! नात्यांना बळकट करण्याचा दिवस, असा करा सेलिब्रेट

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 11, 2018, 01:11 PM IST

'व्हॅलेंटाइन वीक'मधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रॉमिस डे. अर्थात आणाभाकांचा दिवस. आयुष्यभर एकमेकांसाठी काहीतरी करण

 • promise day news

  'व्हॅलेंटाइन वीक'मधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रॉमिस डे. अर्थात आणाभाकांचा दिवस. आयुष्यभर एकमेकांसाठी काहीतरी करण्यासाठी आणाभाका घेण्याचा, वचन देण्याचा, आयुष्यभर एकमेकांचा सांभाळ करण्याची ग्वाही देण्याचा हा दिवस. यादिवशी नव-नव्या जोडप्यांसह प्रेमबंधनात अडकलेले सर्वजण एकमेकांवर आयुष्यभर प्रेम करण्याची आणि प्रेम करणाऱ्यांना सदैव मदत करण्याची वचने देतात. यादिवशी वेगवेगळे इमेजेस, मेसेजेस पाठवून तरुणाई आपल्‍या भावना व्‍यक्‍त करतात.


  पुढील स्‍लाइडवर वाचा, जोडीदाराला तुम्‍ही असे करु शकता प्रॉमिस...

 • promise day news

  सर्व परिस्थितीत तुझी काळजी घेईन. तुझ्यावर नेहमी प्रेम करेन.

 • promise day news

  तुझ्या आरोग्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन.
   

   

 • promise day news

  तुझ्या सुख-दु:खात सहभागी होईन.   

 • promise day news

  तुला कधीही काहीही कमी पडणार नाही, याची मी काळजी घेईन.

 • promise day news

  मी केलेल्या सगळ्या वचनांची पूर्तता करेन. तुझी आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतो.

 • promise day news

  माझ्या प्रत्येक वस्तू, अन्न, संपत्तीचा वापर तुझ्या सहभागाने करेन, प्रत्येक कृतीमध्ये माझ्याइतकाच सहभाग देईन.

 • promise day news

  दु:खात धैर्याने आणि सुखामध्ये अधिकाराची भावना न ठेवता प्रत्येक प्रसंगी सगळ्यांशी मिळून मिसळून, गर्व न बाळगता वागेन.

   

 • promise day news

  एकमेकांशी एकरूप राहण्यासाठी प्रयत्नशील असेन, सर्वार्थी एकनिष्ठ वागेन.

 • promise day news

  तुझ्या आनंदासाठी योग्य असणारे प्रत्येक वर्तन आवडीने आणि माझे कर्तव्य समजून करेन.

   

 • promise day news

  तुझ्या सुख-दु:खात मी सामील होईन, सर्व प्रयत्नांनी तुझी दु:ख वाटून घेईन.

 • promise day news

  सामाजिक कार्यात विनाअडथळा, तुझा विरोध न करता मी सामील होईन, तुला संपूर्ण सहकार्य करेन.
   

 • promise day news

  वरील सर्व सहा वचने मी मनापासून दिली आहेत, ते पूर्ण करण्यासाठी त्यांचे मनोभावे पालन करेन.

 • promise day news

  प्रॉमिस डे! नात्यांना बळकट करण्याचा दिवस
  या दिवशी वाईट गोष्टी सोडण्याचे, आयुष्यभर चांगले वागण्याचे आणि आयुष्यात काही नवीन करून दाखवण्याचे वचन दिले जाते. नात्यांना बळकट करण्याच्या हा दिवस तुम्‍ही असाही साजरा करु शकतात. 

 • promise day news

  मित्र-मैत्रिणी
  शाळा, महाविद्यालय किंवा सामाजिक आयुष्यातही मित्र-मैत्रिणींची साथ एकमेकांना मिळत असते. आजच्या दिवशी आयुष्यभर एकमेकांसोबत राहून मदत करण्याचे वचन देऊ शकतात. त्यामुळे मैत्री अधिक घट्ट होण्यास मदत होते. मैत्रीत ‘धन्यवाद’, ‘माफ करा’ या सारख्या शब्दांना जागा नसते. मात्र मित्रांच्या गरजा ओळखून संकटात त्यांची मदत करण्याला वचनबद्ध होण्यासाठी हा ‘प्रॉमिस-डे’(वचन दिवस) फायदेशीर ठरतो.

   

 • promise day news

  व्यावसायिक
  व्यवसायात वचनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. उत्तम व्यवहार चालविण्यासाठी व्यावसायिकांनी एकमेकांना दिलेली वचने पाळणे हा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो.व्यवसायात आपल्यापेक्षा लहान किंवा मोठय़ांना आलेल्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याबद्दल त्यांना आश्वासित करण्याची संधी आज व्यावसायिकांना मिळणार आहे.

Trending